कोरेगाव मुख्याधिकाऱ्यांवर आरोप पण खुलासा करण्यासाठी नगरसेवक व पदाधिकारी पुढे का ?- रमेश उबाळे

85

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.19जानेवारी):-कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत पुराव्यासह निवेदन दिले होते. या निवेदनावर कारवाई व्हावी. म्हणून आंदोलन केले. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करणे ऐवजी काही नगरसेवक व पदाधिकारी पुढे येऊन का बोलतात ? याचा शोध घ्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना कोरेगाव नगरपंचायतीचे नागरिक व नगरसेवक उपस्थित असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आता शांतता प्रिय कोरेगावातील नागरिकांनी केली आहे.

काल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरेगाव नगरपंचायतीचे १४ नगरसेवक व शिवसेना शिंदे गट भाजप पदाधिकारी यांनी खोटे आरोप करून निवेदन दिले आहे. सबळ पुरावे असल्याशिवाय रमेश उबाळे कोणतेही आंदोलन करत नाही . त्यामुळे रमेश उबाळे यांनी केलेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने कोरेगाव नगरपंचायत मधील काही असंतुष्ट लोकांनी जातीचे कार्ड वापरून बुजगावणे उभे केले आहे. कोरेगाव नगरपंचायती मध्ये भ्रष्ट कारभार चालू आहे. .यासंदर्भात वारंवार तक्रारी आल्या. परंतु भ्रष्ट कारभार व अधिकाऱ्याच्या विरोधात निवेदन दिल्यानंतर काही नगरसेवकांना अचानक आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याची बुद्धी सुचलेली आहे.या चार दिवसांमध्ये काही घटना कशा घडल्या ? याचे आपल्याकडे पुरावे आहेत.

कोरेगाव नगरपंचायती मध्ये चाललेला कारभार पाहता एकाच रस्त्याला दोन वेळा निधी खर्च करणे ,भंडारे कॉलनी मधला रस्ता एकदा डांबरी सडक, एकदा ट्रीमिक्स काँक्रीट का ? नगरपंचायतीची बॅटरी घोटाळा पुराव्यासह उघडकीस आणला, एक केळे विकणारा , एकाचे किराणा मालाचे दुकान ,आपल्याला बॅटरी व रिपेरिंग ची सर्विस कसा देऊ शकतो? हा अभ्यासाचा विषय आहे .कोणता तरी बोगस माणूस उभा करून खोटे, लायसन देऊन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करत आहात.

निवेदनाचा अभ्यासपूर्ण चौकशी करू त्वरित कारवाई करावी . अन्यथा दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेत नसल्याने आत्मदहन करत आहे .असा इशारा देण्यात आलेले आहे. या निवेदनावर कोरेगाव नगरपंचायतीचे हेमंत आनंदराव बर्गे, गणेश सुभाष धनावडे, प्रीतम आनंदराव बर्गे, अभय शहाजीराजे बर्गे, दिनेश सणस ,आकाश रामदास येवले व स्थानिक ग्रामस्थांची नावे आहेत.