मंदिरासारखी स्वच्छता प्रत्येक गावात निर्माण करा – धन्ंजय साळवे

58

🔸चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात मंदिर स्वच्छता अभियान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21जानेवारी):- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हा परिषद अंतर्गत आज चंद्रपूर तालुक्यातील वढा या तिर्थक्षेत्री मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी मंदिर ज्याप्रमाणे नियमित स्वच्छ राखल्या जाते. त्याचप्रमाणे गावालाच ग्रामस्थांनी मंदिर समजुन, मंदिरासारखी स्वच्छता जिल्ह्यातील प्रत्येक गावात निर्माण करा. असे आवाहन चंद्रपूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वच्छ भारत मिशनचे समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक यांनी केले. उमक यांनी मंदिर स्वच्छता अभियानाविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शनातुन माहिती दिली. यावेळी मंचावर वढा ग्रामपंचायत चे सरपंच किशोर वरारकर, जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी सभापती ब्रिजभुषण पाझारे, स्वामी चैतन्य महाराज मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सर्व मार्गदर्शकांनी मंदिरा सह गावाची शाश्वत स्वच्छता कशी राखावी.गाव आरोग्य दायी कसा राखता येईल याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

वढा गावात लोकांमध्ये जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. ग्रामस्थांना एकत्रित करून गावांच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातील महिला मंडळ, पुरुष, युवा वर्गांनी श्रमदान करून मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला. मंदिर परिसरात मान्यवरांच्या शुभ हस्ते फुलांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मंदिर स्वच्छता अभीयानात चंद्रपूर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, पंचायत समितीचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदचे कृष्णकांत खानझोडे, साजिद निजामी,प्रविण खंडारे,गितेश गुप्ता, तृशांत शेंडे,मनोज डांगरे,बंडू हिरवे, अरशीया शेख,पुजा विश्वकर्मा यांनी उपस्थित राहुन गावात उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकोडा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी राजेश भानोसे यांनी तर आभारप्रदर्शन वढा ग्रामपंचायत चे सरपंच किशोर वरारकर यांनी केले. हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गावात राबविण्यात आला असुन, उपक्रमात मोठ्या स्वरूपात ग्रामस्थांनी सहभाग घेवुन मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले.