बेडके महाविद्यालयामध्ये करियर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

77

✒️फलटण(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

फलटण(दि.२४जानेवारी):- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)महाविद्यालय फलटण मध्ये अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज बारामती व अग्रणी महाविद्यालय योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने करिअर मार्गदर्शन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. संदेश बिचुकले सर यांनी प्रस्तावना केली तसेच त्यांनी सांगितले तसेच ज्ञानात भर कशी करावी हे सांगितले. वाणिज्य विभागाच्या प्रा.भावना झेंडे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच NAAC चे आय क्यू एसीचे कॉर्डिनेटर प्रा.डॉ.श्री . दिपक राऊत सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला व आपले बहुमूल्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. दत्तात्रय मोरे सर व प्रा.हेमराज गिरी सर आम्हाला लाभले.तसेच अध्यक्ष म्हणून आपल्या कॉलेजचे आदरणीय प्रा.डॉ.उदय जाधव सर प्रा. डॉ.दिपक राऊत सर उपस्थित होते.

प्रा.दत्तात्रय माने यांनी विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले ते म्हणाले स्वतःला आपल्या चांगल्या पद्धतीने तयार केले पाहिजे स्वतःची ओळख व कॉलिटी समजून घेतली पाहिजे. प्रा. डॉ.दत्तात्रेय मोरे यांनी तीन गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे समस्या ,मनस्थिती ,परिस्थिती यावर कसे काम करायचे?पुढे ते कोणत्या परिस्थितीतून आपण पुढे जाऊ शकतो.आपण आपल्या स्वतःला प्रेझेंट कसे केले पाहिजे त्यांनी सांगितले.एमबीए परीक्षा (CET)बद्दल मार्गदर्शन केले एमबीए केल्यामुळे आपल्याला कोणत्या संधी आहेत त्या सांगितल्या.एमबीए मधून कसे करिअर होऊ शकते, करिअरच्या अनेक वाटा सांगितल्या. आता आपण काही केले नाही तर पुढे जाऊन आपल्याला मार्ग सापडणार नाही असे त्यांनी सांगितले.तसेच प्रा.डॉ.दिपक राऊत यांनी करिअर बद्दल माहिती सांगितली .करिअरची आता चिंता केली नाही तर पुढे जाणार नाही याबद्दल त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा.डॉ.संदेश बिचुकले सर यांनी केले तसेच राज्य विभागाचे प्रा.श्रेयस कांबळे सर यांनी आभार मानले तसेच कार्यक्रमाचा आढावा सांगितला कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे प्रा.भावना झेंडे, प्रा. पुनम घाडगे, प्रा.कांचन कुंभार तसेच इतर प्राध्यापक वर्ग सदर कार्यक्रम साठी उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते.