गांधी हत्या आणि आज या विषयावर 30 जानेवारीला परिसंवाद

104

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.28जानेवारी):-राष्ट्रपिता महात्मा गांधीजी विचारमंचच्या वतीने मंगळवार दि. 30 जानेवारी, 2024 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर याठिकाणी अतिशय महत्वाच्या गांधी हत्या आणि आज या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. टी. के. सरगर, प्रमुख पाहुणे प्रा. किसनराव कुराडे, प्रमुख वक्ते कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर खोबरे, युवा व्याख्याते अक्षय जहागीरदार, स्वागताध्यक्ष मुक्ता फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

सदर जाहीर परिसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधीजी विचारमंचच्या अध्यक्षा व निमंत्रक प्रा. डॉ. स्मिता गिरी आणि समन्वयक डॉ. नामदेव मोरे यांनी केले आहे.