जि. प.सातारा बेकायदेशीर बदल्या व प्रतिनियुक्ती बाबत कास्ट्राईब चे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण प्रजासत्ताक दिनी संपन्न

299

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.28जानेवारी):-सातारा जिल्हा परिषद मधील ठरावीक कर्मच्याऱ्यांची मक्तेदारी बाबत कास्ट्राईब वारंवार आवाज उठवीत असून जिल्हा परिषद प्रशासन गेंड्याच्या कातडी चे असुन कारवाई करीत नसल्याने , त्याचा निषेध म्हणून कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर २६ जानेवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले .

सदर उपोषण मागे घ्यावे म्हणून जि प . प्रशासनाच्या वतीने दिवस भरात बरेच प्रयत्न झाले , पण अजित वाघमारे यांच्या ठाम भुमिकेमुळे सदरचे उपोषण सायं . ६ः०० वाजे पर्यंत चालु होते . जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकुण ८ ते ९ जणांचे उपोषण होते , मात्र फक्त कास्ट्राईब वगळता सर्व आंदोलने मोडीत काढण्यात प्रशासनाला यश मिळाले . फक्त कास्ट्राईब शेवटं पर्यत उपोषणा वर ठाम राहीली सदरच्या पाठींब्यास कास्ट्राईब च्या पदाधिकारी, सभासद व हितचिंतकांनी उत्स्फुर्द प्रतिसाद दिला . जि प मध्ये बऱ्याच कर्मच्यांऱ्यांना वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करण्याची बेकायदेशीर संधी दिली जाते कारण वर्षानु वर्षे एकाच ठिकाणी काम करणारे कर्मचारी अधिकाऱ्यांना गैरलाभ मिळवून देतात.

त्यामुळे त्या कर्मच्या -यांच्या बदल्या झाल्या तरी त्यांना पुनश्च त्याच ठिकाणी प्रतिनियुक्ती दिली जाते . असा कास्ट्राईबचा आरोप आहे .याबाबतचे निवेदन जि प . प्रशासनास देवून ही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात . नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली कास्ट्राईब ची बैठक झाली होती . त्या बैठकीमध्ये खिलारी सो यांच्या सदर च्या बाबी निदर्शनास आणल्या होत्या त्या वेळी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आरोग्य विभागातील अरुण गुरव यांना तात्काळ कार्यमुक्त करा असे आदेश दिलेले असताना, ४ महिने अरुण गुरव यांना डॉ . महेश खलिपे यांनी जाणीवपुर्वक कार्यमुक्त केले नाही , कारण काय तर नवीन ॲम्ब्युलन्स खरेदी चे कामकाज गुरव शिवाय लेखा विभागातील कोणाला येत नाही असा दावा डॉ . खलिपे यांचा आहे .

मुळात राहुल साकोरे उपायुक्त पुणे यांचे स्पष्ट आदेश आहेत तांत्रीक कर्मच्याऱ्यांना अतांत्रीक कामे देवू नये . असे असताना डॉ .खलिपे यांचे आडमुठे धोरण का ? सदरच्या बेकायदेशीर प्रतिनियुक्तीस अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध प्रस्थापित झालेले आहेत का ? जि . प . सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय्य सहाय्यक म्हणून स्टेनोग्राफर पदाच्या व्यक्तीलाच ते काम देणे बंधन कारक आहे . सध्या जिल्हा परिषद मध्ये आकृती बंदा मध्ये दोन पदे असुन एक रिक्त व एक पद सचिन कांबळे यांचे असताना फक्त ते अनु जातीचे असल्याने त्यांना तेथे कामकाज करू दिले जात नाही , त्या ठिकाणी जितेंद्र देसाई व घाडगे नामक दोन कर्मचारी काम करीत आहेत . देसाई यांना गेली १२ वर्षे स्विय्य सहाय्यक पदाची जबाबदारी का दिली जाते , या मागे कोणते अर्थ कारण आहे . या झारीतील शुक्राचार्याना बदली धोरण नाही का ? ग्रा प .विभागाकडे संतोष दिक्षीत नामक कर्मचारी गेली ७ वर्षे प्रतिनियुक्तीवर असुन सदरचा ऑडीट पॉईंट कमिशनर ऑफीसने घेवूनही गेली ७ वर्षे उपस्थिती दाखल्या विना पंचायत समिती वाई कोणत्या नियमाने त्यांचे दरमहा वेतन अदा करत आहे.

कोरेगांव तालुक्यातील प्रा आ केंद्र वाठार स्टेशन येथील औषध निर्माण अधिकारी सुनिल कोळी हे गेली १७ – १८ वर्षे त्याच ठिकाणी कार्यरत आहेत त्यावर तालुका अधिकारी गांधीले उत्तरे देतात की सदरचे पद एकाकी पद असल्याने व बदल्यांची टक्के वारी कमी असल्याने सदरची बदली केलेली नाही . सदरच्या सर्व प्रश्नाबाबत अजित वाघमारे यांनी जि . प . प्रशासनाच्या वतीने मध्यस्थी असणारे श्री . आर के पाटील यांच्या वर प्रश्नाचा भडीमार केल्यावर श्री पाटील हे गडबडुन गेले . त्यानंतर अजित वाघमारे यांनी त्यांना विचारले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा . प्र . ) का उपोषण स्थळी आले नाहीत . त्यावर पाटील म्हणाले की अति .मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाण्यास आदेश केले होते पण ते कराड दौऱ्या वर असल्याने येऊ शकले नाहीत . त्यावर अजित वाघमारे व कास्ट्राईब पदाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉल द्वारे संभाषण घुले ( सा प्र . ) यांनी करावे असा आग्रह धरला . तसा पाटील यांनी श्री . घुले यांना फोन केला मात्र श्री . घुले यांनी व्हीडिओ कॉल वर येण्याचे टाळले.

त्यानंतर मात्र अजित वाघमारे व इतर पदाधिकारी यांनी आक्रमक भुमिका घेतली की ३१ जानेवारी च्या आत बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द न झाल्यास आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून फेब्रुवारी च्या प्रत्येक सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा . प्र . ) व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन करावे लागेल ‘ , आणि त्यातून ही फेब्रुवारी अखेर प्रतिनियुक्त्या रद्द न झाल्यास आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून नाईलाजास्तव मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा प्र . ) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेत यात्रा काढावी लागेल . अशी आक्रमक भुमिका कास्ट्राईबने घेतली आहे . सदरच्या आंदोलनास विश्वास पवार , संतोष भोकरे , तुषार मोतलिंग, विलास बनसोडे , प्रा . प्रकाश कांबळे , किशोर टोणपे , अंकुश रोकडे , संजय साळवे , आदित्य गायकवाड , मनोहर सावंत , ढेबे, शिलवंत, अरुण पवार , लक्ष्मण कदम , माने , दिक्षा पवार ‘ खाडे इ . उपस्थित होते .