नामदार भुजबळ साहेबांनी मराठा नेतृत्व केले तर समाज डोक्यावर घेईल- संजय जाधव

95

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.31जानेवारी):- सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण मनोज जरांगे- पाटील यांचे नेतृत्व मराठा समाजाचे स्वीकारले आहे. त्यामुळे बहुजन समाजाचे नेते नामदार छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे नेतृत्व स्वीकारल्यास हा समाज त्यांना डोक्यावर घेईल .कारण, आपल्याला विषमतेची दरी कमी करायची आहे. असे स्पष्ट प्रतिपादन मराठा अभ्यासक संजय जाधव यांनी केले आहे.

आपल्या भारत देशामध्ये विविधतेने नटलेली परंपरा आहे. या परंपरेला छेद देण्याचे यशस्वी झालेले नाही. आणि होणारही नाही. कारण, सध्या सोशल मीडियावर वैचारिक भूमिका मांडण्याऐवजी काहीजण हेतू परस्पर जातीय द्वेष पसरवत आहे. हीच मोठी चिंतेची बाब आहे.
आज खऱ्या अर्थाने मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय असा ग्रामीण भागात कुठेही संघर्ष पाहण्यास मिळत नाही. किंबहुना आदरणीय नामदार छगन भुजबळ यांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी घेतलेला निर्णय हा त्यांच्या दृष्टीने स्वागत आहे .परंतु ,पाच ते दहा जाती वगळता इतर मागासवर्गीय मधील साडेतीनशे जाती ह्या निर्धास्त अवस्थेत आहेत.

त्यांना त्याचे काही देणे घेणे नाही. असे दिसून आले आहे. तरीसुद्धा मराठा व इतर मागासवर्गीय तसेच दलित आणि अल्पसंख्याक असे सर्व मिळून आपण भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, व्यसनविरुद्ध एकत्र लढा उभारू या. ते गरजेचे आहे. भ्रष्टाचार व व्यसन या गोष्टींमुळे सर्व समाजाचे प्रचंड नुकसान होत आहे. शासकीय पातळीवर एखादा जातीचा अधिकारी असेल आणि त्याच जातीच्या व्यक्तीचे काम असेल तर ते काही काम करण्यासाठी पैसे कमी घेत नाही किंवा दुसऱ्या जातीचा आहे म्हणून जास्त पैसे घेत नाही. ही व्यावहारिक बाजू आहे.

वास्तविक पाहता सर्व समाजातील सधन लोकांना आरक्षण नको तर राजकारणासाठी आरक्षणाच्या चळवळीचे नेतृत्व करायचे आहे. हे त्रिवार सत्य आहे. मराठा समाज हा शोषित आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला मानणार आहे. त्यामुळेच तर मंडल ऐवजी कुमंडल याचा प्रसार व प्रचार मोठ्या वेगात सुरू आहे. बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाने महाराष्ट्रात समाज सुधारक गाडगेबाबा, स्वतंत्र सैनिक किसनवीर ,वसंतराव नाईक, शंकराव जगताप, ना.ग.गोरे , रत्नप्पा कुंभार,एस.एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस, प्रकाश आंबेडकर, मधु दंडवते, बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर दत्ता सामंत, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, तात्यासाहेब कोरे शाहीर अमर शेख अशा अनेक विचार व व्यक्तींचे तसेच समाजसुधारकांचे विचार आत्मसात केलेले आहेत. त्यामुळे आदरणीय छगन भुजबळ यांचे नेतृत्व स्वीकारलेले आहे .हे नाकारून चालणार नाही . आज इतर मागासवर्गीय समाजातील बहुतांश लोक हे आरक्षण चळवळीपासून स्वतःला दूर ठेवत आहे. त्यामुळे नामदार भुजबळ यांनी मराठा समाजाचे नेतृत्व स्वीकारून आरक्षण चळवळीपासून एक विधायक चांगला संदेश द्यावा .अशी अपेक्षा आहे.

साबरमती के चंद्र तुने कर दिया कमाल… रघुपति राघव राजाराम अशी घोषणा राष्ट्रपिता महात्मा गांधींनी शंभर वर्षांपूर्वी घेतली होती. आज शंभर वर्षानंतर जय श्रीराम व आयोध्या चे मंदिर उभारणीनंतर जय श्रीराम हा जयघोष जातीवादी चे स्वरूप प्रकट करतोय काय ? अशी शंका निर्माण होते. पूर्वीच्या काळी समाजाची नाळ असलेली व्यक्ती सर्व समाजाचे नेतृत्व करत होते त्यामुळे सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेत होते . अलीकडच्या काळामध्ये समाजाशी नाळ नसलेले व्यवसाय म्हणून राजकारणात आलेले काही नेत्यांच्या मुळे सध्याची परिस्थिती दिसून येत आहे. सामाजिक भान ठेवून आरक्षण सर्वांना देणे शक्य आहे पण अलीकडच्या काळात देवधर्म, यात्रा- जत्रा यापेक्षा आरोग्य शिबिर व्यवसाय व्यसनमुक्ती शिबिर गरजेचे आहे. त्याबाबत फारशी जागरूकता कुणी करत नाही. कारण लोकांना धार्मिक बनवून त्यांच्याकडून मत घेण्याची स्पर्धा लागलेली आहे. वास्तविक पाहता महात्मा गांधी सारख्या गुजराती समाजाने क्रांती केली असे स्पष्ट करण्यात आले. या वेळेला अजित निकम अनिल माळी शहाजी गुजर प्राध्यापक वाघ आदी मंडळींची या गोष्टीला संमती असल्याचे अधोरेखित झालेले आहे.