सिद्धनाथच्या गुहेत अखेर वाघ घुसलाच!

103

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸शेखर गोरेंचा करिष्मा दाखवत राजेंद्र जाधवांचा षटकार

म्हसवड(दि.3फेब्रुवारी):-संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व सहकाराची अर्थवाहिनी असलेल्या श्री.सिद्धनाथ ना.सह.पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ.जयकुमार गोरे पुरस्कृत सिद्धनाथ सभासद,सेवक परिवर्तन पॅनलने सत्ताधारी सुनील पोळ पुरस्कृत सहकार बचाव पॅनल चा १३/० जागा मिळवत दारुण पराभव करत विरोधकांना धूळ चारली आहे.विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे ना.निंबाळकर,प्रभाकर देशमुख,अभय जगताप यांच्यासह अनेक नेतेमंडळी लढाईत उतरले.तरीही परिवर्तन पॅनलने विजयश्री खेचून आणत आ.जयकुमार गोरे यांचा करिष्मा पुन्हा दाखवून दिला आहे.

श्री.सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत आ.गोरेंसह सहकाऱ्यांनी सभासद व ठेवीदारांना पारदर्शक कारभाराची आणि संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी जाहीरनाम्याद्वारे ग्वाही दिली होती.पतसंस्थेच्या स्थापनेपासून दुसऱ्यांदा व कै.वाघोजीराव पोळ यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे अनेक दिग्गजांचे लक्ष लागून राहिले होते. २४ शाखांच्या ठिकाणी ३४ मतदान केंद्रावर अतिशय चुरशीने ८६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.तब्बल ७५.९२ टक्के मतदान झाल्याने परिवर्तन होणार याची कुणकुण लागली होती.

या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा अरुण गोरे,राजेंद्र जाधव,अर्जुन काळे या उमेदवारांची होती.अरुण गोरे अर्जुन काळे हे आ.जयकुमार गोरे तर राजेंद्र जाधव हे शेखर गोरे यांचे विश्वासू मानले जातात.जयकुमार गोरे हे जिल्हा बँकेचे संचालक होते तर शेखर गोरे विद्यमान संचालक आहेत.दोन्ही बंधूंनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारात प्रवेश केला आहे.मात्र त्यांच्या समर्थकांनी प्रथमच सहकार क्षेत्रात नशिब आजमावले आहे.राजेंद्र जाधव यांनी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला तर अरुण गोरे व अर्जुन काळे तालुका व जिल्हा परिषदेच्या राजकारणात मुरब्बी मानले जातात.

सिद्धनाथ पतसंस्था विविध पुरस्काराने सन्मानित ५०० कोटी व्यवसाय करणारी संस्था कर्मचाऱ्यांना पगार,बोनस,सभासद,ठेवीदारांचा विश्वास अशी पतसंस्थेची ओळख आहे. मात्र संस्थापक वाघोजीराव पोळ यांच्या निधनानंतर संस्थेतील कर्मचारी व मावळते चेअरमन सुनील पोळ यांच्यात बेबनाव उफाळून आला,त्यातच सुनील पोळ यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे आरोप झाले.

हे सत्तानाट्य सुरू असतानाच संचालक मंडळाची निवडणूक लागली.सुनील पोळ यांच्या विरोधात बहुतांश कर्मचारी उतरले. त्या कर्मचाऱ्यांना आ.गोरे यांच्या खमक्या नेतृत्वाची साथ मिळाली,तर शेखर गोरे गटाचे राजेंद्र जाधव व रासपचे मामूशेठ वीरकर त्यांच्या सोबतीला आले.

चौकटः
*नवनिर्वाचित संचालक मंडळ:*
अर्जुन चांगदेव काळे,महादेव विश्वनाथ कदम,चंद्रकांत सुदाम जगदाळे,बापू ज्ञानू जाधव,राजेंद्र ब्रह्मदेव जाधव,विजय रंगराव जाधव,दत्तात्रय नथुराम देशमाने,नारायण जगन्नाथ वीरकर,नंदाबाई चंद्रकांत दडस,पुनम रणजीत पोळ,जयवंत श्रीरंग रोकडे,बाबासाहेब बाळासो विरकर,अरुण दादासो गोरे

*पराभवाची कारणे:*
आ.गोरे पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्व सहकारी सदस्य कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच या इराद्याने मैदानात उतरले होते.खमक्या उमेदवारांसह आखलेली रणनीती यशस्वी ठरली तर सत्ताधारी सुनील पोळ यांच्या प्रचारात समन्वय,नियोजन व प्रचारार्थींचा अभाव होता.त्यामुळे आ.रामराजे नाईक निंबाळकर व प्रभाकर देशमुख यांची साथ मिळूनही त्यांचा धोबीपछाड झाला.यामुळे पतसंस्थेत सत्तांतर झाले आहे.