श्री सिद्धनाथ निवडणुकीत पराभव झाला असता तर जबाबदारी स्वीकारली असती का?-गोरे समर्थकांचा मार्मिक सवाल

632

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3फेब्रुवारी):- माण -खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात प्रमुख अर्थ वाहिनी असणाऱ्या श्री सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सामुदायिक प्रयत्नतून यश मिळालेले आहे. परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची घाई झालेल्या काही नेत्यांच्याच समर्थकांनी आपल्यामुळेच हा विजय झाल्याची वल्गना सुरू केली आहे. जर श्री सिद्धनाथ पतसंस्थेत त्रिमूर्ती नेत्यांच्या पॅनलचा पराभव झाला असता तर त्याची जबाबदारी एकट्याने स्वीकारली असती का ? असा मार्मिक सवाल मान खटावचे खंबीर नेतृत्व व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या समर्थकांनी उपस्थित केलेला आहे.

माण -खटाव दुष्काळी भागाला न्याय मिळावा यासाठी आदरणीय स्वर्गीय सदाशिवत्यात्या पोळ, वाघोजीराव पोळ, धोंडीराम वाघमारे अशा रथी महारथी लोकांनी अथक परिश्रम घेतले. काही अंश दुष्काळ दूर करू शकले नाहीत. परंतु ,एक सक्षम अशी प्रशासनातील पिढी उभी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. सहकार चळवळ सुद्धा त्यांनी उभी केली. परंतु, कधीही संघर्ष निर्माण केला नाही. आज खेड्यापाड्यामध्ये संघर्ष दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सभासद, सेवक वर्ग व शिवसेना-भाजप रा.स.प. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन यश संपादन केलेले आहे.

स्वर्गीय वाघोजीराव पोळ व स्वर्गीय चंद्रकांत दडस यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सभासदांनी मतदान केले होते. जय पराजय हा निवडणुकीचा निकाल असतो. परंतु काहींना खोटं बोला पण रिटर्न खोटे बोला. ही सवय झालेली आहे. त्यामुळे कोणताही विजय आला की पुढे येऊन माझ्यामुळे हा विजय झाला. अशी फुकटची जाहिरातबाजी केली जाते.वास्तविक पाहता सामुदायिक यशाचे वाटेकरी हे सर्वजण असतात पण दुर्दैवाने पतसंस्थेच्या निवडणुकीत पराभव झाला असता तर तो मी नव्हेच. अशा पद्धतीने प्रसारमाध्यमातून वेगळी भूमिका मांडली असती. या निवडणुकीत लक्ष घातली नाही अन्यथा विजय झाला असता असेही सांगण्यात ते विसरले नसते.

काहींच्या नावात जय असला तरी आगामी निवडणुकीत त्याच्यापुढे परा हा शब्द जय पुढे लागेल. हे त्यांनी विसरू नये.या पराजयाचे शिल्पकार हे शेखर गोरे असतील. असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. घोडा मैदान आता जवळ आलेले आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या नेत्याचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागण्यापेक्षा आपली नसलेली कर्तबगारीवर गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कामाच्या तुलनेने हिम्मत असेल तर मतदान मागून विजय व्हावे.

सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जाहीरनामा व प्रसार माध्यमातून एकट्याचा फोटो का लावला नाही ? याचे अगोदर माण खटावच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावे. फलटण तालुक्यात मिळालेली मते ही खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचा करिष्मा आहे. हे आम्ही मोठ्या मनाने मान्य करतो .असे त्यांनी स्पष्ट केले.