विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत कृष्णा वाघमारेला गोल्ड मेडल

71

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.10फेब्रुवारी):-दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी विभाग स्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धां राधाकृष्णन मंगल कार्यालय, शाळा – बेबलेवाडी,नुने,मेंढा रोड, सातारा येथे संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड च्या इ.११ वी शास्त्र मध्ये शिकणाऱ्या कृष्णा महादेव वाघमारे विद्यार्थ्यांने शालेय विभाग स्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले आणि आपल्या प्रशालेचे आणि म्हसवड शहरांचे नांव उज्वल केले.

तसेच त्याची जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धा २०२४ साठी निवड झाली. त्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ऍड.श्रीमंत पृथ्वीराज विजयसिंह राजमाने, विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रशिक्षक – श्री. लोखंडे सर यांनी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या