वॉरियर्स फाउंडेशन चे कार्य प्रेरणादायी : संपत बारस्कर

134

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.12फेब्रुवारी):-लहान मुले घडवणे म्हणजे दगडी मूर्तीला आकार देण्यासारखे असुन ते काम प्रामाणिकपणे वॉरियर्स फाउंडेशन करीत आहे,परिसरातील छोट्या बालकांसाठी जवळच सोय झाल्याने पालकांना समाधान होत आहे* असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.

वॉरियर्स फाउंडेशन संचलित प्रि प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे हे होते.तर विचारपिठावर शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,डॉ.सुरेखा जायभाय, कवी सुभाष सोनवणे, अरूण आहेर, भामा गोसावी,राजेंद्र चोभे,अध्यक्षा कवयित्री शर्मिला गोसावी उपस्थित होते.

पुढें बोलतांना संपत बारस्कर म्हणाले की, इंगर्जी माध्यमांच्या शाळांची आवशकता असुन गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्याच संस्थेला लोकही सहकार्य करतात. या बालकांचे भवितव्य निश्चितच उज्वल असेल. अध्यक्षपदावरून बोलताना ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, बालकांना विविध पैलू घडवण्याचे काम या ठिकाणी होत असून ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आयुष्य घालवले अशा व्यक्तींच्या नावाने शिक्षण क्षेत्रातील प्रज्ञावंत, गुणवंत शिक्षकांचा गौरव आमच्या हस्ते होत आहे, हा आमचाही सन्मान आहे. ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला ते हाडाचे शिक्षक आहेत.

यावेळी डॉ.सुरेखा जायभाय, राजेंद्र चोभे, शाहिर अरुण आहेर, कवी सुभाष सोनवणे,कवयित्री सरोज अल्हाट,शर्मिला रणधीर, आरती गिरी यांनी मनोगत व्यक्त केले.प्राथमिक शिक्षकांसाठी असलेले राम दादाबा गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार संदिप राठोड व लक्ष्मण खेडकर तर त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार बाळासाहेब गांगर्डे, नजमा शेख, सुजाता पुरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्मृतिचिन्ह,शाल, सन्मान पत्र व प्रवास खर्च रक्कम असे पुरस्कारांचे स्वरूप होतें.

वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलच्या बालकांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.गौरव भुकन याने स्वागतगीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी संदीप गोसावी सर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कवयित्री स्वाती ठुबे व हर्षली गिरी यांनी केले. कार्यक्रमास मजले चिंचोली सोसायटीचे संचालक गोरक्षनाथ गिरी, सरला सातपुते, शामा मंडलिक, सुरेखा घोलप, दिपक शेळके दुकानदार यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बबनराव गिरी सर,सायली खंडागळे, संगीता गिरी, स्मृति घोडेस्वार,आरती गिरी, दिशा गोसावी,वर्षा गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी पुरस्कार प्राप्त कवी संदीप राठोड, लक्ष्मण खेडकर, बाळासाहेब गांगर्डे,नजमा शेख, सुजाता पुरी यांनी मनोगत व्यक्त केले.