रासेयो शिबिरार्थीनी केली हिंदू स्मशान भूमीची साफसफाई

150

 

अमरावती : श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिरा अंतर्गत दत्तक ग्राम मंगरूळ दस्तगीर येथील हिंदूस्मशानभूमीची राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या शिबिरार्थीनी श्रमदानातून हिंदू स्मशानभूमीची साफसफाई केली. मंगरूळ दस्तगीरचे सरपंच श्री सतीश हजारे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात आली.तदनंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व शिबिरार्थींनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेत संपूर्ण स्मशानभूमीची साफसफाई केली.स्मशानभूमीतील वाढलेली काटेरी झाडे, झाडे-झुडपे,गांजरगवत निर्मूलन सोबतच स्मशानभूमी परिसरात एका वृक्षाची लागवड करण्यात आली आणि इतर वृक्षांना पाणी पुरविण्यात आले.विशेष म्हणजे त्याच गावात एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यांच्या अंत्य विधीपूर्वी स्मशानभूमीची पूर्ण साफसफाई करण्यात आली.ज्या ठिकाणी प्रेताचा अंत्यविधी केला जातो त्या ठिकाणावर सर्व मुलींनी हातात झाडू घेऊन त्या परिसराची पूर्णपणे साफसफाई उस्फूर्तपणे केली.तद्नंतर सरपंच सतीश हजारे यांनी भारतीय संस्कृतीत स्त्रिया-मुलींचे स्मशानभूमीत येणे वर्ज्य आणि मुला-मुली मध्ये असलेली भीती याबाबत मार्गदर्शन केले.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ नरेश इंगळे यांनी शिबीरार्थी व गावकरी यांचे आभार मानलेत.
या अभियानात प्रा.सुषमा थोटे
राष्ट्रीय सेवा योजना गटप्रमुख वैष्णवी बुराडे तसेच वैष्णवी गावंडे,आचल दिघोरे, गौरी ठाकरे ऋतुजा ढगे, साहिल झिबड, करिष्मा शिवरकर,तेजस्वी मेश्राम, प्रणव हुडे,वैष्णवी गावंडे,ऐश्वर्या मराठे, साक्षी निस्ताने, पायल महात्मे,सोनाली शिवरकर, प्राची ठाकरे,हर्षल काळे, ऐश्वर्या शेंडे, प्राजक्ता शिदोडकर, कुलदीप मोहोड, पायल शिवरकर,आचल ढानके रेखा वडूरकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावकरी सहभागी झाले होते.