रासेयो विशेष शिबिरादरम्यान पोलीस स्टेशन भेट

160

 

 

अमरावती: श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे *सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर (मंगरूळ दस्तगीर) अंतर्गत मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनला भेट देण्यात आली.यावेळी ठाणेदार सुलभा राऊत यांनी शिबीरार्थीशी संवाद साधला.ठाणेदार राऊत यांनी पोलिस प्रक्रिया समजून सांगितली तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मुलींना सक्षमीकरण व रोजगार संधी याबाबतीत टीप्स दिल्यात. तदनंतर पोलीस वसाहत परिसरात साफसफाई अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश इंगळे, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा.श्यामला वैद्य गटप्रमुख वैष्णवी बुराडे तसेच वैष्णवी गावंडे,आचल दिघोरे, गौरी ठाकरे ऋतुजा ढगे,साहिल झिबड, करिष्मा शिवरकर, तेजस्वी मेश्राम, प्रणव हुडे, ऐश्वर्या मराठे, साक्षी निस्ताने, पायल महात्मे, सोनाली शिवरकर, प्राची ठाकरे,हर्षल काळे,ऐश्वर्या शेंडे, प्राजक्ता शिदोळकर,कुलदीप मोहोड, पायल शिवरकर,आचल ढानके रेखा वडूरकर यांच्यासह सर्व शिबीरार्थी सहभागी झाले होते