वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. जाधव यांचा शुभेच्छा समारंभ

147

 

कराड :(दि. 15, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे प्राचार्य डॉ. एल.जी.जाधव यांचा शुभेच्छा व सत्कार समारंभ आयोजित केला होता. प्राचार्य डॉ. जाधव हे त्यांचा नियत कालावधी पूर्ण करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित ‘आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेगाव’ येथे प्राचार्य पदावर रुजू झाले आहेत. त्या निमित्त संस्था व महाविद्यालयातर्फे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. जाधव सर हे विद्यार्थी प्रिय प्राचार्य होते. फेब्रुवारी 2018 पासून त्यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे प्राचार्य पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली . त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयास आय.एस.ओ. दर्जा प्राप्त झाला. तसेच त्यांनी अकॅडमी ऑडिट मध्ये कॉलेजला अ दर्जा मिळवून दिला. कोरोना काळात महाविद्यालयात युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. लँग्वेज लॅबची निर्मिती केली. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयास अनेक पारितोषिके, स्कॉलरशिप तसेच क्रीडा क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली. या त्यांच्या कामाची दखल घेऊन संस्थेतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील सहकारी प्रा. डॉ. आर. आर. थोरात, प्रा.डॉ.डी.पी.जाधव, प्रा. श्रीमती.एस. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा.आर.ए. कांबळे, प्रा.श्रीमती. पी.एस. सादीगले, तसेच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी मनोगते व्यक्त केली. त्यामधून डॉ. जाधव यांचे काणखर , मनमिळावू ,चैतन्यदायी अशा प्रकारचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्या मनोगतातून उलघडून दाखवले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. जाधव सर यांनी आपली जडणघडण आणि विद्यार्थ्या प्रति बांधिलकी याची आठवण करून दिली. संस्थेने काम करण्याची संधी दिली याबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री अल्ताफहुसेन मुल्ला यांनी प्राचार्य डॉ.जाधव यांच्या कामाची प्रशंसा केली. तसेच संस्थेच्या आदर्श कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेचे सदस्य व विश्वस्त मा. श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका) हे ही उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.श्रीमती. एस. आर. सरोदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. श्रीमती. एस. एस. शिंदे यांनी केला. तर आभार प्रा. श्रीमती. एस. एस. मधाळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व संस्था पदाधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.