पत्रकारांनी लिखाण करत असताना जे सत्य आहे ते सत्य आपल्या लेखनातून व्यक्त केले पाहिजे

255

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16फेब्रुवारी):- पत्रकार व पोलीस यांच्यात समनवय संवाद कार्यक्रम बोलताना गंगाखेड येथील नव्याने नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक दिलीप कुमार वाघमारे यानी आपले मत मांडताना पोलिसांकडून जनतेसाठी केलेल्या कामाचे मूल्यमापन सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पत्रकारांनी लिखाण करत असताना जे सत्य आहे ते सत्य आपल्या लेखनातून व्यक्त केले पाहिजे.या पूर्वीचा सर्विसचा अनुभव सांगत असताना पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की,या पूर्वी माझी सर्विस ज्या झालीआहे.

त्या ठिकाणी माझी व पत्रकारा सोबतचे आमचे नाते मैत्रीपूर्ण असून मी कुठल्याही पत्रकार सोबत दुजाभाव केलेला मला आढळून येत नाही.त्यामुळे पत्रकार पोलीस संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पत्रकारांनी आमच्याशी समन्वय ठेवून जनहिताचे कामे करण्यासाठी सहकार्य करावे. आमच्याकडून काही चूक होत असेल तर आपणही आमच्या निदर्शनास आणून द्यावी.

असे मत गंगाखेड पोलीस स्टेशनचे नव्याने नियुक्त झालेले गंगाखेड पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी मत व्यक्त केले.या वेळी उपस्थित पत्रकार यांनी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी उपस्थीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, पी.एस.आय.तुळशीराम चित्तेवार यांची उपस्थिती होती.पत्रकार समनवय संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस जमादार जामकर यानी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, यानी केले .