२५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय संविधान बचाव परिषदेचे आयोजन

113

(भीम टायगर सेनेचा पुढाकार)

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)

उमरखेड(दि.23फेब्रुवारी):- “प्यार का जवाब प्यार से वार का जवाब तलवार से” धर्मातील नागरिकाला सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य दर्जाची संधी समानता देणारे जगातील एक मेव देण्याकरिता राज्यस्तरीय संविधान बचाव परिषदेचे सामाजिक संघटना भीम टायगर सेना शाखा उमरखेड जिल्हा यवतमाळ च्या वतीने दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता रेस्ट हाऊस समोर महागाव उमरखेड येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष फायर ब्रँड वक्ता दादासाहेब शेळके (संस्थापक/अध्यक्ष भीम टायगर सेना) तर उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. मोहनराव मोरे (दराटीकर) हे असणार आहेत.विशेष उपस्थितीमध्ये गोपाळ अग्रवाल, सुभाषराव दिवेकर, बाळु पाटील चंद्रे, प्रज्ञानंद खडसे, सुधाकर लोमटे, संतोष जोंगदंडे, सुनील चिंचोलकर, संबोधी गायकवाड, मिलिंद धुळे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व भिम टायगर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सूत्रसंचालक भीमशाहीर देवानंद पाईकराव हे करणार आहेत.गायक अजय देहाडे (काळजावर कोरल नाव, भीम मोत्याचा हार) यांचा प्रबोधनात्मक त्यांचा कार्यक्रम होणार आहे.तसेच सत्कारमूर्ती म्हणून अझर भाई खान पत्रकार, राजेश ढोले पत्रकार,प्रवीण वानखेडे गट विकास अधिकारी, चंद्रमणी सावरकर, विनोद बरडे, सतीश, कोल्हे, शेख निसार, अंबादास धुळे, रमामाता महिला मंडळ, उमरखेड इत्यादींचा भीम टायगर सेना तर्फे सत्कार होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शाम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष, सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष, कैलास कदम तालुका अध्यक्ष, संदीप विणकरे, करण भरणे प्रफुल दिवेकर, आकाश श्रवले, बबलू भालेराव, राहुल पाईकराव, नितीन आठवले,लीलाबाई हाटकर, मिनाबाई खिल्लारे, उषाताई इंगोले, संगीता धुळे, मंगलाबाई धुळे,सुशीलाबाई ठोके, पंचफुलाबाई विणकरे इत्यादींनी केले आहे.