नगर पालिकेच्या केमिकलयुक्त पिण्याचे पाण्याची प्रदुषण नियत्रंण मंडळ व जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार

119

🔸बंधाऱ्याचे पाणी सोडून नवीन पाणी घेण्याची मागणी

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.23फेब्रुवारी):- शहराला केमिकल चे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचारी आणि कारणीभूत असलेल्या साखर कारखान्यावर कायदेशिर कडक कार्यवाही करणे बाबत

प्रदुषण नियत्रंण मंडळ व जिल्हाधिकारी यांचे कडे मुव्हमेन्ट फॉर पीस ॲन्ड जस्टीस फॉर वेलफेअर (एमपीजे ) या सामाजिक संघटने तर्फे तक्रार करण्यात आली .

तक्रारीत जल (पी आणि सीपी) अधिनियम,१९७४ हा मध्यवर्ती कायदा ०१/०६/१९८१ रोजी महाराष्ट्र कायद्याचा संदर्भ देवून त्यानुसार पाणी (पी आणि सीपी) अधिनियम, १९७४ च्या कलम ४ च्या तरतुदी व संर्दभीय कायद्यानुसार पिण्याचे पाणी , वापरायचे पाणी याची गुणवत्ता , दर्जा, निकष ठरविले आहे.

वरील तरतुदी चा सर्रासउलंघन होत आहे आणि गेल्या जवळपास पंधरा दिवसापासून दूषित पाणी चा पुरवठा नगरपरिषद मार्फत होत आहे हा जीव घेणा प्रकार आहे.यास त्वरित थांबविणे गरजेचे आहे.

या संपूर्ण प्रकाराला दोषी असलेल्या संस्थेवर व अधिकाऱ्यावर कडक कायदेशिर कार्यवाही होणे गरजेचे आहे. जो पर्यंत शुद्ध पाणी पुरवण होत नाही तो पर्यंत दुषित पाणी पुरवठा पात्रातुन सोडून द्यावा नवीन पाणी घ्यावे आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था त्वरित करण्यात यावी . या जिवघेण्या प्रकरावर भा. द.वि.व संदर्भीय कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

वसंत साखर कारखान्याने कारखान्यातील अशुद्ध मळीचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्याने सदर पाणी उमरखेड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात आल्याने शहरात गेल्या पंधरा ते विस दिवसापासून अशुद्ध, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा नगर पालिका प्रशासना मार्फत होत आहे. अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी शहरातील नळांना येत असल्याने शहरात नागरिकांना मळमळ,उलट्या, डायरिया, पोटदुखी, त्वचा रोग यांसारखे पोटासंबंधी सर्व आजारांनी नागरिकांना ग्रासल्याचे चित्र सध्या उमरखेड शहरात पाहायला मिळत आहे.

सदर अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने शहरातील नागरिकांचा जीव मेटाकुटिस आला असताना सुद्धा कारवाई करण्यासंदर्भातील जिल्हाधिकारी यांनी कारखाण्यावर व नगरपालिका प्रशासन वर कोणतीही कारवाई केली नाही.

शहरातील अनेक संघटना व नागरिकांनी अनेक तक्रारी करून सुद्धा न.प. १५,२० दिवसा नंतर सुद्धा तेच आरोग्यास घातक असे पाणी पाजत आहे.तक्रारी नंतर मुख्धिकारी यांनी बंधाऱ्यातील पाणी सोडून देवू असे आश्वासित केले परंतु पूर्ण दुषित पाणी न सोडता काही तास पाणी सोडून बंधारयाचे गेट पूर्ववत बंद करण्यात आले . गेट कोणाच्या आदेशाने बंद करून जिवाशी खेळ मांडण्यात आला.

पूर्ण अशुद्ध पाणी सोडून नदी पात्रात धरणातून पाणी का घेण्यात आले नाही , ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यां नी कुसुर केला त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच वसंत सहकारी साखर कारखान्यावर एफ .आय .आर .करण्यात यावा. अशी मागणी निवेदना व्दारे एमपीजे या सामाजिक संघटने तर्फे करण्यात आली.कार्यवाही न झाल्यास कायदेशिर आंदोलन – उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.