जय गुरुदेव विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप…

152

 

धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील

धरणगाव — तालुक्यातील खर्दे येथील जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सवित्रीमाई यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. तद्नंतर अतिथी मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करतांना अनेक विद्यार्थांनी शाळा – शिक्षक यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी परीक्षा, स्पर्धा, बाह्य जग, आई – वडील आणि यशाचे गमक याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.व्ही.एस.भोलाणे यांनी विद्यार्थांना निरोगी आरोग्यासाठी सदृढ शरीर आवश्यक असल्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय गुरुदेव माध्यमिक विद्यालय खर्दे चे अध्यक्ष ऍड.व्ही.एस.भोलाणे तर प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्यासह संस्थेचे संचालक आत्माराम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रशांत नेमाडे, तसेच शिक्षक विलास चौधरी, नरेंद्र चौधरी, योगेश पाटील, चंदू भोळे, विकास शिरसाठ, श्याम सपकाळे, श्याम पाटील, हरी चौधरी, पटेल सर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश माळी यांनी आभार प्रदर्शन योगेश पाटील यांनी केले. सर्व कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर मुलांना गोडधोड देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.