चोपडा महाविद्यालयात ‘एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र’ उत्साहात संपन्न

42

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.25फेब्रुवारी):-येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा भूगोलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बदलत्या वातावरणाचा मानवी जीवन व कृषी व्यवस्थेवर होणारा परिणाम’ या विषयावर आधारित ‘एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या पहिल्या उदघाटन सत्रानंतर दुसऱ्या सत्रात सत्राध्यक्ष म्हणून डॉ.पी. के.पाटील हे उपस्थित होते तसेच रिपोटीअर म्हणून डॉ. शत्रुघ्न मोरे यांनी या सत्रामध्ये काम पाहिले. या सत्रात परीक्षक म्हणून डॉ.सचिन मोरे व प्रा.पी.वाय.मगरे यांनी यशस्वी कामगिरी बजावली.

या सत्रामध्ये म्हसदी महाविद्यालयातील प्रा.आर.सी.अहिरे, झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथील डॉ. वैजनाथ चव्हाण तसेच एस.पी.डी. एम.महाविद्यालय, शिरपूर येथील संशोधक विद्यार्थी सतीश अडगळे यांनी आपल्या शोधनिबंधांचे सादरीकरण केले. या सत्रामध्ये सादर केलेल्या शोध निबंधांचा आढावा डॉ.शत्रुघ्न मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मांडला.

या सत्राच्या शेवटी अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ.पी.के.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या चर्चासत्राच्या तिसऱ्या समारोप सत्राप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.मदनलाल सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. एन.एस. कोल्हे, चर्चासत्र समन्वयक डॉ. शैलेश वाघ, प्रा.पी.वाय.मगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.सचिन मोरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना महाविद्यालय व संस्था यांचेविषयी कौतुकोद्गार काढले तसेच चर्चासत्र आयोजन व नियोजनाबद्दल अभिनंदन केले. ‘आजच्या संशोधकांनी समाजोपयोगी संशोधन करायला हवे तरच समाजाची उन्नती होईल’ असेही ते यावेळी म्हणाले.डॉ. मदनलाल सूर्यवंशी आपले मनोगत करताना म्हणाले की, संशोधन करून समाज प्रबोधन व समाज जागृती करणे ही प्रत्येक संशोधकाची जबाबदारी आहे. त्यामुळे समाजाचे व कृषी व्यवस्थेचे प्रश्न सोडवणे आजच्या काळाची गरज असून संशोधन क्षेत्रापुढे हे सर्वात मोठे आव्हान आहे’. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचे, संस्थेचे भरभरून कौतुक केले.

याप्रसंगी डॉ. रमेश अहिरे, डॉ.वैजनाथ चव्हाण आणि संशोधक विद्यार्थी सतीश आडगळे यांना ‘उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण पुरस्कार’ म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

समारोप सत्राचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘संशोधनाच्याद्वारे राष्ट्र व समाजाची प्रगती साधता येते त्यामुळे समाज उपयोगी संशोधनावर आजच्या संशोधकांनी भर देणे गरजेचे आहे’. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा थोडक्यात आलेख सादर केला व चर्चासत्र आयोजन, नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

या समारोप सत्राचे सूत्रसंचलन व्ही.डी.शिंदे यांनी केले तर आभार डॉ.मुकेश पाटील यांनी मानले.या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. मुकेश बी. पाटील, डॉ. सौ.संगीता पाटील, मोतीराम बी. पावरा, डी.पी. सोनवणे, राजू निकम तसेच विविध समिती प्रमुख व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेप्रसंगी विविध राज्यातून आलेले संशोधक तसेच बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.