कारखान्यापासून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा अखेर ऊस तोडीला यंत्राद्वारे सुरुवात

769

✒️ढाणकी प्रतिनिधी(राजेश घुगरे)मो:-9637684021

उमरखेड(दि.3मार्च):-तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना पोफळी काही कारणास्तव बंद चालू होत असल्याने ढाणकीतील कास्तकार ऊस तोडी पासून त्रस्त झाले ,असताना त्यांच्या ऊस तोडीचा शेड्युल संपवून सुद्धा ऊस तोडणी होत नसल्याने ढाणकी येथिल कास्तकार त्रस्त झाले असता अखेर ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा कोणताच कारखाना ऊस नेण्यास शेतकऱ्या जवळ येत नाही.

त्यावेळी सुभाष शुगर प्रा. लि. जयवंत पाटील नगर हडसणी ता. हदगाव जि. नांदेड चे कार्यकारी संचालक सुशील कुमार देशमुख ,मुख्य शेतकरी अधिकारी मधुकरराव पतंगे, ऊस पुरवठा अधिकारी किशोर वानखेडे व पांडुरंग रावते यांनी ढाणकी परिसरातील शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक व मानसिक त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत शेतकऱ्यांच्या फडावर जाऊन सिलीप बॉय बंडू उर्फ विश्वास नलावडे यांना वाहनाला स्लीप देण्यास सांगितले व ऊस तोडणी यंत्र मालक सुभाष दानवे या युवकांनी मी तुमचा ऊस तोडण्यास तयार आहे व तुमचा ऊस कारखान्याला देईल असा शब्द दिला असता त्या यंत्रचालकाने ऊस तोडून नेल्याबद्दल ढाणकी येथील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असता उपस्थित बाळू शहापुरे , बकाजी रावते पाटील ,अविनाश पांडे, छबुराव धोपटे, शेख हरून भाई व स्वप्नील चिकाटे यांनी आभार मानले

……………
मी वसंत सहकारी साखर कारखाना यांच्या भरोशावर माझ्या शेतात ऊस लावला पण ऊस नेण्यास कारखान्याची यंत्रणा ढिसाळअसल्यामुळे माझा ऊस जात नव्हता तेव्हा ऊस यंत्र मालक सुभाष दानवे यांनी मला शब्द दिला की तुमचा ऊस मी कोणत्या ही परिस्थिती घेऊन जातो त्यांनी ते शब्द पार पाडल्यामुळे माझा ऊस कारखान्याला गेला आहे त्यामुळे माझे मानसिक व आर्थिक नुकसान झाले नाही.

शेख हरून रशीद
शेतकरी ढाणकी