प्री-वेडिंग शूटिंगमुळे क्षेत्रमाहूलीचा निसर्गरम्य परिसर गजबजला…

572

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3मार्च):-प्री वेडिंग शूटिंग मुळे लग्नापूर्वीच महिनाभर अगोदर वधू-वरांना मोकळीक दिली जाते. सातारा शहरा नजीक असलेल्या क्षेत्र माहूली येथील कृष्णा व कोयना नदीच्या निसर्गरम्य परिसरात संगम नजीक सध्या शूटिंगसाठी अनेक हौशी व व्यावसायिक फोटोग्राफर तसेच लग्न ठरलेले वधू वर शूटिंग करण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून क्षेत्रमाहू ली येथील काहींनी सुख- सुविधा निर्माण करून पर्यटनाला चालना दिलेली आहे.

पूर्वी लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात अशी आख्यायिका सांगितली जाते .पण अलीकडच्या काळामध्ये लग्नाचा ट्रेड बदलला आहे. आता लग्न घटिका जवळ आली तरी अनेक हौस व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवं वधू वर व त्यांचा मित्रपरिवार नातेवाईक लगीन घाई करत असतात. आता तर प्री-वेडिंग वेडिंग शूटिंग मुळे लग्नापूर्वीच महिनाभर अगोदर वधू-वरांना एकमेकांच्या आवडीनिवडी व राहणीमानाचा अनुभव घ्यावा लागतो.

सातारा शहरा नजीक असलेल्या क्षेत्र माहूली येथील कृष्ण कोयनेच्या संगम नजीक व प्राचीन शिल्पकलेने नटलेल्या अनेक मंदिरामध्ये सध्या प्री-वेडिंग शूटिंगसाठी अनेक हौशी फोटोग्राफर व व्यावसायिक तळ ठोकून आहेत.तसेच लग्न ठरलेले वधू वर शूटिंग करण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अनेक सुख सुविधा निर्माण करून पर्यटनावर चालना दिलेली आहे.

हल्ली लग्नामध्ये प्री-वेडिंग शूट ला नवं वधू-वरांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नववधू वरांना प्री-वेडिंग शूटच वेड लागलेल आहे. लग्नसोहळा आणि त्या अगोदरचे नववधूवरांचे सहवासाचे क्षण कॅमेऱ्यात टिपणे , व्हिडिओ करणे, रिल्स करणे, व्हिडिओ करून युट्युब वर, इंस्टावर टाकणे. याला विशेष महत्त्व आले आहे. सातारा येथील व्यावसायिक फोटोग्राफर निनाद जगताप व पियुष आताळे यांनी सांगितले की, सध्या प्रत्येक गोष्टींमध्ये हौस निर्माण झालेले आहे. फॅशनच्या युगामध्ये दररोज नाविन्यपूर्ण प्रयोग करावे लागतात. विशेषता शहरी भागात राहणाऱ्या अनेक नववधू वर हे ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या अनेक गोष्टींसोबत फोटोसेशन करत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने या फोटोमध्ये ग्रामीण भागातील मातीचा सुगंध ही दरवळतो. चुलीवरील स्वयंपाक, बैलगाडीतील फेरफटका व शेतातील कामे अशा शूटिंगला प्राधान्य दिले जाते. जात्यावरील दळण पारंपारिक वेशभूषा करून मराठी चित्रपटासारखे दृश्य दाखवले जातात.

लग्नाअगोदरच्या नववधू-वरांच्या आठवणीचे फोटो, व्हिडिओ करून त्या आठवणी डोळ्यात साठवून मोठ्या स्क्रीनवर लग्न समारंभात दाखविणे याला महत्व आले आहे. लग्ना अगोदरच्या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त करून व्हिडिओ स्वरूपात त्याची निर्मिती करणे त्याला प्री वेडिंग शूट म्हटले जाते. अनेकदा रिटेक करावे लागतात काही वेळेला तर या प्री-वेडिंग साठी एक आठवडा शूट करावे लागते आणि तशा पद्धतीने सूचनाही केल्या जातात.

अलीकडच्या काळात लग्न म्हणजे एक नुसता धार्मिक विधी नव्हे. तो आनंदाचा, उत्साहाचा, मजेचा एक क्षण मानला जातो. ज्यावेळेस नववधू वराच्या विवाह सोहळ्याची तारीख ठरविली जाते त्या अगोदर नववधू वर प्री-वेडिंग शूट करतात. सुशिक्षित वर्गामध्ये याला अति महत्व आलेला आहे. परंतु ग्रामीण भागातही आता शिवारात, धरण , तलाव ,नदी, विहीर व धार्मिक स्थळ या ठिकाणी प्री-वेडिंग अत्यंत आनंदाने केले जाते

काहीजण लाखो रुपयेही खर्च करतात. क्षेत्र माहूली, लिंब नजीक बारा मोटाची विहीर, मेरुलिंग ,गोवा , कास पठार, कोयना धरण परिसर, कोकण, महाबळेश्वर, काश्मीर मध्ये जाऊन शूट करतात . काही हॉटेल व्यवसायिकांनी यासाठी हॉटेल व वस्तूंचे दर हे ठरवले आहेत त्यानुसार पोषक , दागिने व आवश्यक असणाऱ्या बाबी उपलब्ध केल्या जातात. प्री-वेडिंग शूटच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. प्री-वेडिंग शूट मुळे फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स यांना मोठी मागणी वाढली आहे. त्यामध्ये आता पूर्ण व्यावसयिकता आलेली आहे अगदी पोशाख बदलण्याइतपत छोटासा रूम सुद्धा रेडीमेड तयार करून मिळतो.शूट केल्यानंतर त्याचे हिंदी, मराठी गाण्यासहीत व्हिडिओ पाच,दहा मिनिटाच्या कालावधीत गाणे असलेले स्क्रीनवर सातत्याने विवाह सोहळ्यात दाखवले जातात. त्यामुळे एलईडी स्क्रीनलाही महत्त्व आले आहे.

नववधूवरांचे लग्ना अगोदर चे फोटो, व्हिडिओ प्री -वेडींग शूट याकडे पाहुणेमंडळी, वऱ्हाडीमंडळी, मित्र, मैत्रिणी यांचे विशेष लक्ष राहते आणि ते आवडीने पाहिले जातात. प्री वेडिंग शूट एक आनंदाचा, मजेचा चर्चेचा विषय झाला आहे. पूर्वी लग्नातील जुना अल्बम पाहून अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते अलीकडच्या काळामध्ये प्री-वेडिंग पाहून अनेकांना हसू आवरता येत नाही खूप मजेशीर किस्से ऐकण्यास मिळतात त्यामुळे प्री-वेडिंग करताना फोटोग्राफर म्हणून खूपच काळजी घ्यावी लागते अशी माहिती पियुष आताळे व निनाद जगताप यांनी दिली आहे.