जड – अवजड प्रतिबंध निकामी – प्रतिबंधचा प्रकार फसवा ठरला

120

🔸बघ्यांनी साधला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या कार्यप्रणालीवर निशाणा

✒️उप संपादक(रोशन मदनकर)

भंडारा(दि.5मार्च):-शहरात जिल्हापरिषद चौक येथे जड – अवजड वाहनास प्रतिबंध घातला होता. तर दुसऱ्या बाजूला खाम तलाव चौक येथे प्रतिबंध घातला होता. परंतु आठ दिवसातच प्रतीबंधची मोडतोड झाली.

आज सकाळी जवळपास सात च्या सुमारास MH 36G 4461 क्रमांकाच्या टिप्परने टक्कर देऊन प्रतिबंधला एका झटक्यात तोडले. यावेळी जमलेल्या बघ्यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यावर निशाणा साधत यांच्या कार्यावर प्रश्न निर्माण केले.

भंडारा जिल्ह्यात एकही काम व्यवस्थित न होता फक्त दिखाव्यासाठी शासन प्रशासन अधिकारी काम करीत असतात असे जमलेल्या बघ्यामध्ये चर्चा रंगली होती.जिल्हापरिषद चौकातून सकाळच्या वेळेस स्कूल बसेस चालत असतात तसेच मॉर्निंग वॉक ला ये – जा करणारे लोक असतात त्यामुळे मोठी जीवित हानी होता होता टळली.

प्रतिबंधमुळे जिल्हापरिषद, राजीव गांधी, खाम तलाव चौकातील प्रवाशांना बस न येत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नियोजन सुव्यवस्थित नसल्यामुळे जड – अवजड प्रतिबंधचा प्रकार फसवा ठरला.

______________________

रस्त्याच्या दोन्ही वळणाजवळ सावधानतेचा फलक लावायला पाहिजे होत. आता आमच्याकडून जी कारवाई आहे ती करूच. – (खडसे , ट्रॅफिक पोलिस हवालदार)