गावंडे महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२४ चे आयोजन

47

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.५मार्च):-येथील गो. सी. गावंडे महाविद्याल राष्ट्रीय सेवा योजना मार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२४ चे आयोजन ०७ मार्च ते १३ मार्च दरम्यान दत्त ग्राम नागेशवाडी, हनुमान मंदिर, तालुका उमरखेड येथे होणार आहे.

या विशेष शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती हनुमंतराव गायकवाड (एस.डी.पी.ओ) उमरखेड तसेच राजेश सुरडकर तहसीलदार उमरखेड यांची राहणार आहे.

अध्यक्ष म्हणून यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाजाचे संस्थेचे सचिव डॉ. यादवरावजी राऊत हे असतील व उद्घाटक म्हणून राम देवसरकर (अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज) हे असतील.

दरवर्षी महाविद्यालयामार्फत अशा प्रकारचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सात दिवसांसाठी आयोजित करण्यात येत असते त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे मार्फत होते व त्यासाठी वेगवेगळे उपक्रम जसे नेत्र चिकित्सा, दंतचिकित्सा, लसीकरण कार्यक्रम त्यासोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती, पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रम, स्वच्छ भारत, आर्थिक घडामोडी, जलसंवर्धन, कृषी, उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण, बेटी बचाव, बेटी पढाव, मतदान जनजागृती, युवा विकास इत्यादी प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात व त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून संबंधित मार्गदर्शक बोलवण्यात येतात, गावासाठी आवश्यक असलेले उपक्रम राबविले जातात जसे ग्राम स्वच्छता त्यासोबतच, शोष खड्डे तयार करणे, बंधारा बांधणे इत्यादी उपक्रम सुद्धा घेतले जातात, महाविद्यालयातील रा. से. यो. चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आखणी करतात अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने व प्रा. अर्चना मिटके मॅडम यांनी दिली.

शिबिराचा समारोपासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम व प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार पोलीस स्टेशन उमरखेड असणार आहेत.