सक्षम कार्यकर्ता हाच काँग्रेस पक्षाचा कणा -डॉ. सतिश वारजुकर

83

🔸शंकरपूर -डोमा जिल्हा परिषद सर्कल कार्यकर्ता मेळावा संपन्न

✒️शार्दुल पचारे(प्रतिनिधी चिमूर)

चिमूर(दि.6मार्च):-हनुमान किल्ला मंदिर शंकरपूर येथे शंकरपूर -डोमा जिल्हा परिषद सर्कल काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

मेळाव्याचे उदघाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटक धनराज मुगले, सेवादल चिमूर तालुका अध्यक्ष किशोरजी शिंगरे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विवेक जी कापसे, तालुका काँग्रेस सचिव विजय डाबरे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा सरपंच शंकरपूर साईश वारजुकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष नागेंद्र चट्टे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष भाऊराव बावनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नंदू गावंडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी पाटील गावंडे, काँग्रेस कार्यकर्ते मनोज राणे, शंकरपूर शहर अध्यक्ष गोकुल सावरकर, ग्रामपंचायत उपसरपंच अशोक चौधरी, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सौ. सविताताई चौधरी, माझी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गीता रानडे,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कमल राऊत, माजी सरपंच कोलारी प्रज्वला गावंडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन सावरकर, सचिन रासेकर, पिंटू शेरकी, सौरव जयश्ववाल, आशिष चौधरी, त्याचप्रमाणे शंकरपूर – डोमा जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा असून तो कार्यकर्ता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो.त्याच प्रमाणे कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष संघटनेची कामे करावी व तळागाळातील लोकांना सोबत घेऊन आपल्या पक्षाची ध्येय धोरणे जलसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य करण्याचे आव्हान डाँ. सतिश वारजुकर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोद गौरकर. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक यांनी केले तर आभार यांनी मानले