चिमूर येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न

173

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11मार्च):-अपना मंगल कार्यालय दिन चिमूर येथे चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व नारी न्याय संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस महासचिव माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वारजूकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष नम्रता ताई ठेमस्कर, प्रमुख अतिथी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, कांग्रेस नेते विवेक कापसे, अविनाश अगडे, माजी तालुका अध्यक्ष लताताई अगडे, अनिताताई वारजूकर, विशेष मार्गदर्शक समता दूत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे प्रज्ञाताई राजूरवाडे, ऍड. सिमाताई साखरकर, कार्याध्यक्ष माधुरी रेवतकर, शहर अध्यक्ष गीतांजली थूटे, शहर कार्याध्यक्ष सिमा बुटके,चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटी चिमूर शहर महिला काँग्रेस कमिटी चिमूर शहर महिला काँग्रेस कमिटी सौ. सिमाताई बुटके कार्याध्यक्षा वनिताताई मगरे, दुर्गाताई वैरागडे, विद्याताई चौधरी, लताताई पिसे, भावनाताई बावनकर, प्रज्वलाताई गावंडे, शोभाताई कोयचाडे, प्रितीताई दिडमुठे, नर्मदाताई रामटेके, गिताताई नन्नावरे, भावनाताई पिसे, कमलताई राऊत, अरुणाताई माळवे, शहनाजबाई अन्सारी, दिक्षाताई भगत, अभिलाषाताई शिरभय्ये, ममताताई भिमटे, सुरेखाताई शेंबेकर, चंदाताई कारेकार, वैशाली शेंडे, शिल्पा अंबादे, रिता अंबादे, श्रध्दा बंडे, सुचिता बांबोडे, वनिताताई झिंगरे, मालाताई येरूनकर, वर्षाताई शिवरकर, दुर्गा दिघोरे, रागिनी उरकुडे, शक्ती भंगारे, नम्रता वासनिक, जयश्री निवटे, श्रीकांत गेडाम, अक्षय लांजेवार,आणि समस्त चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटी व महिला भगिनी उपस्थित होते.