दापोरी येथे ८ कोटी २२ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन! माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख व आमदार देवेंद्र भुयार यांचा नागरी सत्कार!

69

 

मोर्शी(तालुकाप्रतिनिधी) : दापोरी येथे ८ कोटी २२ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार देवेंद्र भुयार यांच्या शुभहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
मोर्शी विधानसभा मतदार संघात शिक्षण, आरोग्य, पाणी, पांदन रस्ते,सिमेंट रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांची कामे आमदार देवेंद्र भुयार यांनी हाती घेतली आहे.पायाभूत सुविधांची दर्जेदार निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जात असल्यामुळे शिक्षण, आरोग्य,रस्ते,यासारख्या सुविधांना प्राधान्य देऊन विकासाला गती दिली जात असल्याचे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणल्यामुळे अनेक विकास कामांना गती देण्यात आली आहे.
दापोरी पाळा रस्त्यावरील उंच पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५० लक्ष रुपये,दापोरी येथे पाणी पुरवठा योजना निर्माण करणे १ कोटी ८१ लक्ष रुपये, दापोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम करणे व कर्मचारी निवासस्थान बांधकाम कारणे १ कोटी रुपये,दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील ६ नवीन वर्गखोल्या बांधकाम करणे ६८ लक्ष रुपये,दापोरी येथील जिल्हा परिषद शाळा डिजिटल कारणे व इतर सोई सुविधा निर्माण करणे ३१ लक्ष रुपये, दापोरी ग्रामपंचायत नवीन इमारत बांधकाम करणे २० लक्ष रुपये, लालदास स्वामी विद्यालय संपूर्ण शाळा डिजिटल करणे ७ लक्ष रुपये,नागोराव ढोमने यांच्या घरापासून वासुदेवराव धानोरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम कारणे ७ लक्ष रुपये, नवीन व्यायाम शाळा साहित्य १० लक्ष रुपये, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये,बौद्ध विहार येथे वॉल कंपाऊंड व सौंदरीकरण करणे ७ लक्ष रुपये, लालदासबाबा सभागृहावरील उच्चदाब वाहिनी स्थलांतरित करणे ३ लक्ष रुपये, विजय विघे यांच्या शेतापासून ते रमेश विघे यांच्या शेतापर्यंत १ किमी.पांदन रस्ता खडीकरण करणे 25 लक्ष रुपये,संजयराव निमजे यांच्या शेतापासून ते गजाननराव बांबल यांच्या शेतापर्यंत १ किमी.पांदन रस्ता खडीकरण करणे २५ लक्ष रुपये,हिंमत गोमकाळे यांच्या शेतापासून ते श्रीकृष्णराव गेडाम यांच्या शेतापर्यंत १ किमी पांदन रस्ता खडीकरण करने २५ लक्ष रुपये,विजय कडू यांच्या शेतापासून ते ढोमणे यांच्या शेतापर्यंत १ किमी.पांदन रस्ता खडीकरण करणे २५ लक्ष रुपये या संपूर्ण कामांकरिता आमदार देवेंद्र भुयार यांनी ८ कोटी २२ लक्ष रुपये मंजूर करून विकासकामे केल्याबद्दल दापोरी येथील संपूर्ण गावकऱ्यांतर्फे आमदार देवेंद्र भुयार,शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी माजी महिला बाल कल्याण सभापती वृषाली विघे, माजी जी.प.सदस्य उषाताई नागमोते,डॉ. प्रदीप कुऱ्हाडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार,आत्मा समिती अध्यक्ष उमेश गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके,मोहन मडघे, सरपंच संगीता ठाकरे यांच्यासह खरेदी विक्रीचे संचालक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होती.