पुणे‌ येथे ४ थी भटके विमुक्त युवा परिषद संपन्न

210

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : पुणे येथील एम आय टी विद्यापीठामध्ये ४थी भटके विमुक्त युवा परिषद पार पडली.यावेळी भटके विमुक्तांच्या विकासाचा जाहीरनामा मांडण्यात आला.ही परिषद भटके विमुक्त युवा परिषद, भटके विमुक्त, आदिवासी संयोजन समिती व एम आय टी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
या परिषदेत महाराष्ट्रातील भटके विमुक्त जमातीत कार्य करणाऱ्या २८ संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण गायकवाड,कर्वे इंस्टिट्युटचे संचालक डॉ.महेश ठाकूर, डॉ.साजी बिबी,डॉ.चिंचोलीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी उद्घाटनप्रसंगी प्रथम परिषदेची प्रास्ताविक अध्यक्षा शैला यादव यांनी केले.तर उद्घाटक लक्ष्मण गायकवाड यांनी भटके विमुक्त जमातीतील अंतर्गत हेवेदावे विसरून संघटीत होण्याचे आवाहन केले तर डॉ.महेश ठाकूर यांनी भटके विमुक्त समाजात आधुनिक आणण्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.यावेळी सुत्रसंचलन शरद बाराते यांनी केले.
त्यानंतर दुसऱ्या सत्रात शिक्षण व आरक्षण या विषयावर डॉ.विठ्ठल थबे,डॉ.जॉर्ज,रंजिता पवार,देवकुमार अहिरे,सरोज शिंदे,प्रियांका जाधव यांनी विचार व्यक्त केले.तर आरोग्य व महिला सक्षमीकरण या सत्रामध्ये लता सावंत, मुमताज शेख, ललिता धनवटे, धनराज डांगे,भरत विटकर यांनी मांडणी केली.तर शेवटच्या राजकीय प्रतिनिधित्व व मुलभूत अधिकार या विषयावर अॅड.अरुण आबा जाधव, डॉ.सुधीर अनवले,व्दारका पवार,दिलीप परदेशी,मुनीर शिकलगार यांनी विचार मांडले.
या परिषदेचे आयोजन शिरीष वाघमारे, संदिप आखाडे,शरद बाराथे,शैला यादव,ललिता धनवटे,प्रियांका जाधव,मुनीर शिकलगार यांनी केले.शेवटी संयोजक संस्था व उपस्थित कार्यकर्त्यांनी भटके विमुक्तांच्या विकासासंदर्भाचा जाहीरनामा लिखीत स्वरुपात संकलित केला.येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देऊन यावर योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.