सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मीडिया सेलचे कामकाज गतिमान

71

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड : सध्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला असून सध्याची निवडणूक ही सर्व अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष लागलेले आहे. खरं म्हणजे निवडणुका येतात त्याबद्दल दुमत नाही. यंदाची निवडणूक ही बऱ्याच अर्थाने गाजणारी आहे. सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयात मीडिया सेलच्या माध्यमातून कामकाज गतिमान करण्यात आलेले आहे त्याची आता चर्चा सुरू झालेली आहे.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या पण आता जशा पद्धतीने मीडिया बद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. तशी शंका यापूर्वी घेतली गेलेली नाही. कारण मीडिया व प्रसार माध्यमांनी जबाबदारीने काम केले होते .अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण मीडिया काही प्रमाणात सोशल मीडिया वर चेष्टेचा विषय झालेला आहे. सोशल मीडिया व युतुब च्या माध्यमातून काही दुर्लक्षित बातम्या प्रसारित करताना त्याची कोणतीही शहनिशा पाहिली जात नाही. यावर निर्बंध घालण्यासाठी आता प्रथमच चांगल्या पद्धतीने योजना आखली गेलेली आहे. यामुळे पेड न्यूज व पॅकेज घेणाऱ्या प्रवृत्तीला काही अंश प्रमाणात आळा बसेल. असे मानण्यात येत आहे.
सातारा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर सध्या मीडिया सेल कामकाज सुरू झाले आहे . या मीडिया सेलच्या माध्यमातून जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे तसेच शासकीय इतर विभागाचे कर्मचारी बारकाईने कामकाज पाहत आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १२ एप्रिल पासून ते १९ एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर प्रचार यंत्रणा अधिक जोमात व जोशात येणार आहे. अशा वेळेला एखाद्या राजकीय पक्ष अथवा उमेदवाराचे किंवा त्यांना फायदेशीर ठरेल अशा माध्यमातून बातम्या प्रसारित करणे. यावर अंकुश ठेवणे. हे लोकशाहीसाठी अत्यंत उपयुक्त असा निर्णय आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी .अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
सध्या या मीडिया सेलवर वस्तू व विक्रीकर विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वन विभाग, माहिती कार्यालय, आकाशवाणी व पशुसंवर्धन विभाग तसेच इतर विभागा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या सर्वच बातम्या राजकीय बातम्या या प्रमाणीत करूनच प्रसारित कराव्यात. खातरजमा करूनच वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे. हा पत्रकारांचा नैतिक अधिकार आहे. त्या अधिकाराचा गैरवापर होऊ नये. ही अपेक्षा आहे. एखादी चूक समजू शकतो परंतु चूक चूक असूनही ती बरोबर म्हणून मांडणे किंवा एखादी गोष्ट बरोबर आहे ती चुकीच्या पद्धतीने पेड न्यूज या सदराखाली प्रसारित करणे. पॅकेज मध्ये धरण्यात आली तरी त्याची तपासणी होणार आहे.त्यामुळे आता प्रसारमाध्यमांनीही काळजीपूर्वक व वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित करून या लोकशाहीच्या चौथ्या खांबाची आब राखावी. अशी विनंती प्रसारमाध्यमात काम करणारे अनेकांनी केलेली आहे. नयापूर्वी सब घोडे बारा टक्के या न्यायाप्रमाणे चालत होते. पण, आता आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. कोणत्या बातमीला कात्री लावणे व कोणती बातमी प्रसारित करणे. याची आता बारकाईने तपासणी होणार आहे. त्यामुळे आता बातमीदारी करताना जे खऱ्या व वस्तुनिष्ठ बातम्या देतात. त्यांना काहीच काळजी नाही. जे ठरवून करतात. त्यांच्यावर मात्र कायद्याचा बडगा उभारला जाणार आहे. हा कुणाकुणाला उगारला जाईल ? हे भविष्यात समजेल परंतु, आपण आपल्यावर काटेकोरपणाने नियमावली तयार करून कारवाईची वेळ येऊ नये. याची काळजी घ्यावी. शेवटी जिथे वाट आहे. तिथे पळवाट असते. मग, ती वाट घसरणीसारखी असली तरी त्याचा जपून वापर केला जातो. त्याचा अधिक गैरफायदा घेऊ नये. हेच सुचित करावे वाटत आहे. असं माध्यम प्रतिनिधी सांगू लागले आहेत. दरम्यान सांगली जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत जिल्हा माहिती अधिकारी म्हणून वर्षा पाटोळे यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज केले आहे त्यावेळेला सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जितेंद्र डूडी हे काम पाहत होते.
आज पुन्हा सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे दोन वरिष्ठ अधिकारी काम पाहत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत समाधानकारक असल्याने मीडिया सेलचे कामकाज हे चांगले होईल. अशी अशा व्यक्ती केली जात आहे .