महा.शासनाचे फुले चरित्र साधने समिती वर सत्यशोधक रघुनाथ ढोक यांची दुबार निवड

68

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100*

म्हसवड : – महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वर शासन निर्णय १६ मार्च २०२४ नुसार वावरहिरे,सातारा आणि पुणे येथील रहिवाशी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुन्हा एकदा दुबार निवड झाली आहे.

ढोक हे गेली ३२ वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून गेल्या ४ वर्षापासून महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथात सांगितलेल्या पध्द्तीने सत्यशोधक विवाह लावण्यास सुरुवात केली असून आज पर्यंत ४८ सत्यशोधक विवाह मोफत संपूर्ण महाराष्ट्र आणि तेलंगाना राज्यात ४ लावले आहेत.सोबत अनेक गृहप्रवेश ,प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम देखील सत्यशोधक पध्द्तीने पार पाडले आहेत.

हे सर्व कार्य पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करीत असताना देखील त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी व जर्मन भाषेत ४ रंगी पुस्तक राज्यपाल आणि कुलगुरु यांचे उपस्थितीत प्रकाशित केले सोबत दीनाची साउली,महात्मा फुले गीत चरित्र ,ऐतिहासिक शूर महिला,तुकाराम निती,ज्ञानेश्वर निती व इतर पुस्तके प्रकाशित करीत नुकतेच मराठी व तेलगु भाषेत सत्यशोधक विवाह कसा लावावा म्हणून देखील पुस्तके २ वेळा प्रकाशित केले आहे. तसेच नवीन फुले शाहु आंबेडकर वाद विवाद विचार आणि सविधान साक्षरता पुस्तक प्रकाशित करणार आहेत. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार तसेच पुणे मनपाचा पुरस्कार ,कोव्हीड योद्धा पुरस्कार देखील मिळाले आहेत.सोबत ते अनेक संस्थेचे पदाधिकारी असून विश्व नागरी ग्रा. पतसंस्थेचे ३ री टर्म संचालक आणि पुणे विध्यार्थी गृह सेवक पतसंस्थेचे ४थी टर्म मधील सलग दुसरी टर्म अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.ते नेहमी गरजू ,विकलांग लोकांना आर्थिक मदत, करतात व अनेक उपयोगी साहित्य मिळवून देतात.तसेच नियमित रक्तदान ,वृक्ष लागवड देखील करतात.

त्यांचा निश्चय आहे की या समितीच्या माध्यमातून फुले दाम्पत्यांची जुनी पुस्तके व विविध कार्यावर नवीन पुस्तके अनेक भाषेत उपलब्ध करून शेवटच्या घटकापर्यंत कसे पोहचले जातील याची काळजी घेणार आहेत.तसेच सर्व महापुर्षांचे फोटो एकसारखे शासनाचे वतीने कसे सहज उपलब्ध होतील हे देखील पहाणार आहेत.
त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाचे महाज्योती विभागाकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाड्मय देखील प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करून हे ग्रंथ अल्प किमतीत कसे सर्वांना उपलब्ध होईल हे पाहून शालेय अभ्यासक्रम मध्ये महापुर्षांचे प्रेरणादायी जीवनसंघर्ष येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील सत्यशोधक ढोक म्हणाले आहेत.