रस्त्यावर साचलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे दहागाव ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष

171

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 1 एप्रिल) तालुक्यातील दहागाव महात्मा गांधी म्हणाले होते की गावाकडे चला गावाचा विकास करा. गावाचा विकास हाच या देशाचा विकास असतो.

परंतु विकास करताना आपण काय करत आहोत याची जाणीव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, आणि सदस्यांना असायला हवी.

गावातील काही रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु ग्रामपंचायत सदस्य असलेल्या कविताबाई धुळे यांच्या घरासमोरील रस्ता हा जाणून बुजून बनवलेला नाही.
असा संशय घेण्यात येत आहे.

दहागाव ग्रामपंचायती मार्फत अगदी काही जवळील वर्षामध्ये ज्या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते आणि रस्ताही ठीक ठाक होता. त्याच रस्त्यावर पुन्हा काही तरी लेप लावल्यासारखे करून निकृष्ट दर्जाचे काम करताना सुद्धा आढळून आले होते.

ज्या रस्त्यावर दिवसभर लोकांची ये-जा होते.
गावातील सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त वर्दळ होणाऱ्या रस्त्याची कामे ग्रामपंचायत का करत नाही? यामागे कुठले राजकारण तर नाही ना? अशी संशयाची भूमिका गावातील लोक घेत आहेत.
ज्या ठिकाणी रस्त्याची खरी गरज आहे त्या ठिकाणीच खड्डे का करण्यात आले ? हा सवाल गावातील काही नागरिक उपस्थित करत आहेत.
गावाच्या विकासासाठी जो काही निधी सरकार मार्फत पुरुविला जातो त्याचा गैरवापर झाल्याशिवाय राहणार नाही. अशी माहिती आत्तदिप धुळे यांनी दिली आहे.