पत्रकारितेला समर्पितपणे वाहून घेतलेलं आदर्श व्यक्तिमत्व धम्मपाल हनवते….!

70

 

दैनिक क्रांतीशस्त्रचे मुख्य संपादक धम्मपाल हनवते यांचं समस्त जीवन आणि कार्य मानव जाती समोर प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक असे आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव तथागत भगवान बुद्ध ,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ,राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर महापुरुष त्यांचे आदर्श. त्यांच्या जीवन आणि कार्याचा दूरगामी परिणाम त्यांच्या जीवनावर झाला आहे. असं म्हटलं जातं संस्कारांतून घडतो माणूस आदर्श धम्म उपासिका शील सदाचार कमालीची नीतिमत्ता अपार करुणा कष्टाळू स्वभाव असलेल्या त्यांच्या आई ललिताबाई त्याचप्रमाणे कठोर शिस्तीचे स्वाभिमानी बाणा असलेले वडील यादवराव या दाम्पत्याच्या संस्कारातून धम्मपाल यांच्या जीवनाची जडणघडण झाली. घरामध्ये कमालीचे धार्मिक वातावरण वडील सर्व प्रकारच्या विकारापासून व व्यसनापासून कोसो दूर असलेले आपल्या मुला-मुलींनी शिका व मोठा व्हावं आई – वडिलांचे समाजाचं नाव मोठं करावं असं त्यांना मनोमन वाटे.
याचा सकारात्मक परिणाम धम्मपाल यांच्यावर झाला. अगदी शालेय जीवनापासून कुशाग्र बुद्धिमत्ता विवेकीपणा सामाजिक ,धार्मिक कार्याची आवड यामुळे विद्यार्थी दशेपासून ते त्यांच्या शिक्षकांना मित्रमंडळींना आप्तेष्ट नातेवाईकांना हवे हवेसे वाटत असेल. प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये मनापासून सहभागी व्हायला त्यांना आवडते. सर्वच जाती धर्मामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. असं म्हटलं जातं सज्जनाची संगत चंदन आणि चंद्रमा पेक्षाही श्रेष्ठ असते. चंदनाचा फक्त सुगंध येतो चंद्राचा प्रकाश अल्हाद दायक वाट तो. परंतु सज्जन माणसं त्यांच्या सहवासातून संस्कारातून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला आकार मिळत असतो. धम्मपाल हानवते यांनी आचाराने विचाराने संस्काराने विविध जाती धर्मातील मोठी असलेली ज्येष्ठ मंडळी असलेल्या माणसांसोबत मैत्री करायला आवडते. तसेच थोर महापुरुष समाज सुधारक यांचे चरित्र वाचले. त्यामधून त्यांच्या जीवनाला आकार प्राप्त झाला. पत्रकारितेची अगदी बालपणापासून त्यांना मनस्वी आवड छंद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता त्यामध्ये असलेला निर्भीडपणा कमालीची सामाजिक बांधिलकी समाजातील उपेक्षित ,शोषित ,पीडित ,वंचित, गोरगरीब जनतेचे दुःख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विविध पाक्षिकांमध्ये दैनिकामध्ये प्रभावीपणे मांडले होते. मूकनायक बहिष्कृत भारत जनता आदी दैनिकांमधून भारतामधील गाव कुसा बाहेर राहणाऱ्या आपले न्याय नैसर्गिक हक्क प्रस्थापित समाज व्यवस्थेने नाकारणाऱ्या मनू प्रणित समाज व्यवस्थेवर कोरडे ओढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावीपणे केले होते.
त्या पत्रकारितेचा वसा आपण हाती घ्यावा हा उदात्त हेतूने त्यांनी दैनिक क्रांतीशस्त्र हे वर्तमानपत्र काढले.
हे वर्तमानपत्र काढन्या अगोदर दैनिक लोकमंथन ,दैनिक समर्पण टाइम्स, दैनिक आदर्श गावकरी, दैनिक कुलस्वामिनी सा. प्रजादर्पन अजित न्यूज आदी दैनिकामधून प्रभावीपणे समाजातील व्यथा वेदना दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी अन्य अत्याचार असेल त्याला आपल्या लिखाणाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम त्यानी केला . दैनिक क्रांतीशस्त्र त्याचा परिपूर्ण गेली चार वर्षाचा कालावधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वर्तमानपत्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्याचे काम त्यानी करत आहेत. या वर्तमानपत्रांमध्ये थोर महापुरुष ,समाज सुधारक, संत यांच्या मानवतावादी विचारला प्राधान्य देऊन त्यांच्या जीवनकार्याचे प्रेरणादायी लेख दैनिक क्रांतीशस्त्र मध्ये प्रसिद्ध करत आहेत.
महाराष्ट्र मधून अभ्यासू विवेकी, संशोधन वृत्तीचा फार मोठा लेखक वर्ग त्यांनी मिळाला आहे. आणि हजारोच्या संख्येने वाचक वर्ग ही त्याना मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्राच समाजमन सुसंस्कृत होण्यामध्ये मदत झाली. पूर्णा तालुक्यातील सिरकळस ही त्यांची जन्मभूमी आहे. असं म्हटल्या जातं जननी आणि जन्मभूमी श्रेष्ठ असते.
आपण ज्या भूमीमध्ये वाढलो ज्या आई – वडिलांनी आपल्यावर संस्कार केले. त्यांच्या प्रति आपलं काही देणं आहे. या भावनेतून सिरकळस या ठिकाणी त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे कामकरत आहेत. त्यांनी स्थापन केल्या स्वराज्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गरीब होतकरू कष्टाळू तरुणाईला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. महापुरुषांचे विचार सर्व समाज बांधवांच्या आपल्या मंगल मैत्री भावनेतून गळी उतरविले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या म्हणो युक्ती प्रमाणे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ते एक कुशल मोटार मेकॅनिकल आहे. आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपला प्रपंच ते भागवतात. त्या मधला काही भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाज उपयोगी कामासाठी ते खर्च करतात.
हे करत असताना कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची ते अपेक्षा करत नाहीत. निरपेक्षपणे सातत्यपूर्ण त्यांचं हे कार्य सुरू आहे. त्यांच्या या कुशल कार्याला समर्थ साथ देण्याचे काम त्यांच्या सहचारीणी स्वातीताई काया वाचा मनांन समर्पित भावनेने करत असतात. आपल्या पतीला पत्रकारितेची आवड आहे. समाजकार्याची आवड आहे. वेळोवेळी त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम त्या करत असतात.त्यांच्या जीवन वेलीवर सुंदर अशी दोन फुले उमलली आहेत.सुकन्या सांची व सुपुत्र अंश लेकराचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणे त्यांचा सुपुत्र व सुकन्या शालेय अभ्यासक्रमामध्ये कुशाग्र बुद्धीचे व कमालीचे विनयशील आहे त. धम्मपाल यांच्या कार्यामध्ये त्यांचे बंधू गोरखनाथ त्यांची मोठी साथ आहे. त्यांच्या भावजय शांता ताई यांना आपला दिर समाजसेवा आणि पत्रकारिता यामध्ये प्रामाणिकपणे कार्य करतात. याबद्दल त्यांना सार्थ अभिमान आहे. त्यांचे पुतणे आणि पुतनी अरविंद आणि तेजस्विनी वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेले आपल्या काकांचे लेख आवडीने वाचतात. त्यांच्या प्रिय बहिण दिव्या यांनाही आपला प्रिय भाऊ सामाजिक धार्मिक आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये पत्रकारितेमध्ये समाजसेवा मध्ये काम करतो याबद्दल त्याही समाधानी आहेत.
दिनांक ०८ एप्रिल हा दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक आयुष्यमान धम्मपाल हनवते यांचा वाढदिवस.
बुद्ध विहार पूर्णा (महाराष्ट्र) या ठिकाणी पूजनीय भिख्खू संघाला चिवरदान फलदान देऊन सहकुटुंबासह साजरा करणार आहेत.
वाढदिवसाच्या या मंगल प्रसंगी त्यांना आयु आरोग्य बल वैभव प्राप्त हो वो ही मनोकामना मंगलमय शुभेच्छा….!

श्रीकांत हिवाळे
मा. तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा. जि.परभणी (महाराष्ट्र)