भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी विनोद पाटील

247

 

प्रतिनिधी – पी.डी.पाटील

धरणगाव : लोकसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर नुकतीच भारतीय जनता पक्षाची युवा मोर्चा धरणगाव तालुका ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. बाभुळगाव येथील विनोद नीलकंठ पाटील यांची भा.ज.पा. च्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षासाठी केलेल्या कामाची पावती ही पक्षाने त्यांना दिली असून पक्ष श्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी एकनिष्ठेने पार पाडू व पक्ष वाढीसाठी काम करून तालुक्यात पक्ष अधिक बळकट करणार असल्याची प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली. या निवडी बद्दल धरणगाव तालुक्यासह परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.