राज ठाकरेंचा मोदींना बिनभांडवली बिनशर्त पाठिंबा म्हणजे?

  502

   

  महाराष्ट्राच्या मराठी माणसांसाठी राजकारण करणारा स्वयं घोषित ह्रदय सम्राट यांनी मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी अस्मितेच्या विरोधकांना चारीमुंड्या चित करून बिनशर्त पाठिंंबा.हिंदू ह्रदय सम्राट बाळ ठाकरे यांची मराठी माणसांच्या न्याय हककसाठी लढणारी शिवसेना फोडणारेंना बिनशर्थ पाठिंबा. मुंबई मध्ये येऊन कष्टाची कामे करून पोटभरणारे पर प्रांतीय मराठी माणसाचा रोजगार हिसकाऊं घेतात म्हणून फेरीवाले टॅक्सी वाल्यांना कायदा हातात घेऊन दिवसा ढवल्या मारहाण करणारे मनसे सैनिक महाराष्ट्राचे उद्योग धंदे गुजराताला नेऊन मराठी तरुणांना बेरोजगार करणाऱ्यांना बिनशर्थ पाठिंबा देतात तेव्हा कुठेच खळल्याल खटाक करतांना मनसे सैनिक दिसले नाही.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे चरित हरण केले तेव्हा आणि महाराष्ट्राच्या महापूरुषांचा अपमान करणारा भगत सिंग कोश्यारी,चंद्रकांत पाटील आणि अनेक उपट सुंबे यांना स्वरक्षण देणाऱ्यांना व यांच्या भूमीकेला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या मराठी सुपारीबाज नेत्या विरोधात बुद्धिजीवी विचारवंत साहित्यिक संपादक पत्रकार आपली बुद्धी लेखनी झिजवतांना दिसत नाही.देशहिता पेक्षा मोठे काही नाही. असे सांगणारे देशद्रोही जेव्हा देशभक्त बनून इलेक्टोरल बाँन्ड सारख्या महाघोटाळ्याला करतात. तेव्हा त्यांना आपल्या कुचल्याने लेखणीने फोडून काढणारे मराठी माणसांचे मराठी भाषेचे सुपरीबाज ह्रदय सम्राट बिनशर्थ पाठिंबा देतात तेव्हा मनाला खूप वेदना होतात. देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीय सांगणरे जेव्हा महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या सारख्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेऊन देशभरात जन आंदोलने करून राज्यात केंद्रात सत्ताधारी झाले तेव्हा पासून त्यांना महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार कुठेच दिसत नाही म्हणूनच मराठी माणसांचे मराठी भाषेचे सुपरीबाज ह्रदय सम्राट बिनशर्थ पाठिंबा देतात.त्याचे निर्भय बनो वाल्यांना काहीच वाटत नाही.
  इंडियात राहणाऱ्यांना भारत कधी समजला नाही. भारतात शेती असते त्या शेतीत शेतकरी शेतमजूर वर आकाशात पाहून रात्र दिवस शेतजमिनीत कबाड कष्ट करत असतो. तेव्हा त्याला त्याच्या शेततुन उत्पन्न देणाऱ्या कडधान्य, ज्वारी, उडीद, मुंग, तूर, सोयाबीन कापूस या माला ला हमी भाव हवा असतो. त्यासाठी जन आंदोलन करणार शेतकरी यांना आंदोलनजीवी वाटत होता. त्याला या मराठी माणसांच्या मराठी भाषेच्या सुपरीबाज ह्रदय सम्राटाने कधीच बिनशर्थ पाठिंबा दिला नाही. तो लोकसभा निवडणुकीत मोदींना बिनशर्थ पाठिंबा देतो. याला मराठी माणसांची तरुणांची. मराठा समाजाच्या मनसे सैनिकांची कशाचीच भीती कशी काय वाटत नाही.
  छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि पुतळा वापरुन स्वताची दुकानदारी चलविणारे मराठी माणसांचे मराठी भाषेचे सुपरीबाज ह्रदय सम्राट अरबी समुद्रात शिवस्मारकाची एकही वीट रचली नाही या बाबत एक शब्द तोंडूतून काढतांना दिसले नाही ते मोदीला बिनशर्थ पाठिंबा देतात यांचे एकाही मराठी मानसांना मराठी तरुण सैनिकांना वाईट वाटत नाही. याचे दुख होत आहे.
  मराठी माणसांचे मराठी भाषेचे सुपरीबाज ह्रदय सम्राट राज ठाकरे भलेही मोदींना बिनशर्त पठिंबा देतील पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारांचा मावळा आज ही खेड्या पड्यात दर्या खोऱ्यात बारा बलुतेदार अलुतेदार म्हणून जगत आहे. तो मतदान करतांना विचार करीन असा विश्वास एक मराठी मतदार म्हणून मला वाटतो. दोन समाजात कायम तेढ निर्माण करून स्वतचे अस्तित्व टिकविणारा बिनभांडवली “राज” कारण करणारा नेता ओळख आणि सावध व्हा.शिक्षण,आरोग्य आणि रोजगारात होणारा खासगी मालकांचा भ्रष्टाचार यांना का कधीच दिसत नाही. त्या विरोधात त्यांच्या कानाखाली मारण्याची आरोळी का दिल्या जात नाही. कारण त्यांच्या भरोशावरच तर बिनभांडवली “राज” कारण चालते.हे तरुणांनी विसरू नये.राज ठाकरेंचा मोदींना बिनभांडवली बिनशर्त पाठिंबा म्हणजे काय यांचा मतदारांनी विशेष मराठी आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी गांभीर्याने विचार करून मतदान करावे.
  सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई.
  ९९२०४०३८५९