डॉ.बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ति व स्त्री अधिकारांचे नायक-प्राध्यापक मा. माधुरी गायधनी (दुपटे)

  69

  नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डाक लेखा कार्यालय, नागपूर येथील सभागृहात डॉ. माधुरी गायधनी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी त्यांनी वरील उदगार काढ़लेत. आपल्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की, स्वतंत्र भारतात महिलांना जे अधिकार आणि सवलती मिळाल्या आहेत त्यामागे डॉ.आंबेडकरांच्या संघर्षांची दीर्घ शृंखला आहे.
  महिलांच्या हक्कांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे एकमेव नेते होते.
  संविधानात महिलांच्या कल्याणासाठी आणि सुखसोयींसाठी अनेक तरतुदी आहेत,त्यात त्यांनी कलम 39 चा उल्लेख केला सांगितले की बाबासाहेबांनी स्त्री-पुरुषांना समान कामासाठी समान वेतनाची व्यवस्था कशी केली हे स्पष्ट केले. अनुच्छेद 42 अन्वये बाबासाहेबांनी महिलांसाठी विशेष प्रसूती रजेची तरतूदही केली होती, ज्यामुळे महिला कामगार/कर्मचारी त्यांच्या नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत होत्या.
  आज भारतीय कामगार संघटित क्षेत्रातील असो की असंघटित क्षेत्रातील असो, ते त्यांना ज्या सुखसोयी आणि फायदे मिळत आहेत ते कामगार हितवादी बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांच्या विचारामुळे आहेत. परंतु भारतातील कामगारां सोबतच प्रस्थापित कामगार संघटनांनी सुद्धा बाबासाहेबांनी कामगारांसाठी दिलेले योगदान नाकारण्याचा प्रयत्न केला हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. बाबासाहेबांचे महिलां प्रतीचे योगदान आणि भारतीय कामगारांसाठी केलेल्या कार्याची जाणीव आजच्या कामगारांना करून देण्याचे काम जर कोणी करू शकत असेल, तर आंबेडकरी विचारांची कामगार संघटनाच करू शकते.परंतु सध्या त्या सर्व घटनात्मक तरतूदी व अधिकार कमकुवत व कुचकामी बनविण्याचे काम केले जात आहे,हे षड्यंत्र वेळीच समजून घेऊन संघटित होऊन त्याचा मुकाबला करावा लागेल.
  त्यांनी पुढे स्पष्ट केले की त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा का घेतली,गायधनी मैडम चे अशी स्पष्ट धारणा व विश्वास आहे की बौद्ध धर्म हा असा एकमेव धर्म आहे की जो मानवांना मानवांशी जोडतो आणि तर्कशुद्ध विचार विकसित करतो. यावेळी विचार मंचावर वित्त व संचार लेखा परीक्षण विभागाच्या संचालक श्रीमती सुनीता गुणशेखर, डाक लेखा उपसंचालक सुरेश रोहणे, समितीचे अध्यक्ष सुभाष गजघाटे यांचेही समर्पक भाषण झाले. व्याख्यानाचे प्रास्ताविक भाषण समितीचे सचिव दिलेश चावरे यांनी केले. मंचाचे संचालन श्रीमती प्रार्थना लॉरेन्स यांनी केले तर उपस्थितांचे आभार भावना सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. या व्याख्यानाला कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी राजेश चहांदे, प्रल्हाद बोरकर, प्रशांत गेडाम, सुरेश सुखदेवे, शुद्धोधन लोखंडे, दिनेश बोरकर, सौ. प्रतिभा इंगोले, उज्वला पगारे, स्मिता साठवणे, उषा दडवे, आदी समिति च्या कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.