जि.प.केंद्र शाळा झुरखेडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात संपन्न

51

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा झुरखेडा येथे विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व गुणदर्शन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध विविध गीते त्यावरील आधारित नृत्य नाटक व कलाकृती सादर केल्या. आकर्षक रंगमंच व रंगबेरंगी रोषणाई यावेळी करण्यात आली होती. कार्यक्रमास पालकांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सुरेश पाटील (लोकनियुक्त ,सरपंच झुरखेडा ) सौ छाया ईश्वर पाटील (लोकनियुक्त, सरपंच निमखेडा) , संजय पाटील (उपसरपंच), संदीप पाटील (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती झुरखेडा) उदय पाटील अध्यक्ष ग. स. सोसायटी किशोर चव्हाण (मुख्याधिकारी नगरपालिका पारोळा) अजबसिंग पाटील संचालक, ग .स. सोसायटी, भाईदास पाटील, संचालक ग .स .सोसायटी, विकास पाटील केंद्रप्रमुख ,झुरखेडा शिवाजी पाटील माजी मुख्याध्यापक , सुगनचंद पाटील सचिव, शिक्षक सेना ज्ञानेश्वर पाटील मुख्याध्यापक, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल शेलकर (कलाशिक्षक) , गजानन माळी, समाधान पाटील, नारायण लोहार, सतीश चौधरी, शिवदास महाजन, किशोर चौधरी, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.