डॉ.आंबेडकर नगर भीमजयंतीस ६८ वर्षांंची परंपरा

82

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड :- सन १९५७ साली सुरू झालेल्या व सुमारे ६८ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गंगाखेड शहरातील डॉ.आंबेडकर नगरच्या ३० एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या १३३ व्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा उद्या मंगळवारी (दि.३०) ऐतिहासिक परंपरेत साजरा होत आहे.
६८ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जयंतीचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे जुन्या पिढीतील नेते स्मृतीशेष पी.जी.भालेराव, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय संघटक स्मृतीशेष ॲड.गौतम भालेराव यांच्यानंतर डॉ.आंबेडकर सह.सूतगिरणीचे चेअरमन डॉ.सिद्धार्थ भालेराव यांनी समर्थपणे करत आहेत.
उद्या मंगळवारी शहरातील डॉ.आंबेडकर नगरातील स्मृतीशेष पी.जी.भालेराव सभागृहात (बौद्ध विहार) सकाळी १०:३० वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परभणीचे खासदार संजय जाधव, स्वागताध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भालेराव, समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे, माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संतोष मुरकुटे, विजय वाकोडे, भदंत डॉ.उपगुप्त महास्थवीर (पूर्णा) भदंत मुदीतानंद थेरो (परभणी) यांचे उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होईल. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार प्रदीप शेलार, पोलीस निरीक्षक दिलीपकुमार वाघमारे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांचेसह आंबेडकरी चळवळीचे नेते प्रकाश दादा कांबळे, काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, गौतम मुंडे, रवींद्र सोनकांबळे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे व विजयकुमार तापडिया, विठ्ठलराव रबदडे, लक्ष्मण मुंडे, परभणी जिल्हा बँकेचे संचालक भगवान सानप, मिलिंद सावंत, प्रणित खजे, विष्णू मुरकुटे, यशवंत भालेराव, मनसे नेते बालाजी मुंडे, रत्नाकर शिंदे, ॲड.मनोज काकाणी आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
सायंकाळी ५:४५ वाजता मोठ्या आतिषबाजीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातू पुतळ्याची भव्य रथातून परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांचे हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ होईल.
यावर्षीचा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा पार पडण्यासाठी डॉ. सिध्दार्थ भालेराव यांच्या मार्गदर्शनात कार्यवाहक ॲड.महावीरराजे भालेराव व पत्रकार प्रमोद साळवे, रन्धीरराजे भालेराव, चिंतामणी साळवे, माजी नगरसेविका डॉ.प्रतिभा भालेराव, माजी नगरसेविका स्मिता भालेराव, महिला समिती अध्यक्ष विनाताई कांबळे, बालीताई साळवे, ॲड.बुद्धप्रिय गौतम भालेराव, अध्यक्ष धनंजय साळवे, सल्लागार चिंतामणी साळवे, सोपानराव कांबळे, गुणवंत कांबळे, कार्याध्यक्ष सचिन कांबळे, प्रविण गंगावणे, मोतीराम कोरके, रोहिदास भालेराव, सचिव जिगर गायकवाड, उपाध्यक्ष प्रतीक साळवे, कोषाध्यक्ष नाथ मुंडे, सहसचिव विशाल साळवे, सलमान सय्यद, मुन्ना साळवे, सौरभ घोडके, नागेश भालेराव, आदित्य शिरसाट, भूषण साळवे, शीलवंत कांबळे, प्रवीण साळवे आदी युवा भीमसैनिकांची टीम परिश्रम घेत आहेत. १४ एप्रिल ते ३० एप्रिल या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पंधरवाडा जयंती उत्सवाच्या सांगता सोहळ्यास गंगाखेड तालुका परभणी जिल्हा तसेच मराठवाड्याच्या विविध भागातून आंबेडकरी समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहतो.