स्वातंत्र्य दिन चिरायू हो

26

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्य पासून दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातील बहुतांशी ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका, व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
इसवी सन 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. एकोणीसशे शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. 1857 च्या स्वातंत्र्यसमरा ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. विसाव्या शतकात महात्मा गांधींनी इंग्रजांना “चले जाव” चा नारा दिला.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावर चे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे त सेच दुसर्‍या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे ही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब यांना व सिंधी ना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक यामध्ये मारले हि गेले. पुढे त्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नहि पुढे आला.
स्वतंत्र भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले “जनगणमन “हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र यांनी लिहिलेले “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.
भारताचे सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा ,महाविद्यालये, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान आणि दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांशी रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शन वर देशभक्तीपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम करणे म्हणजेच येथील परंपरा, संस्कार, आणि सर्वसामान्य लोकांवर प्रेम करणे आलेच.

                                      ✒️सौ भारती दिनेश तिडके
                                               रामनगर गोंदिया
                                       तालुका समन्वयक अग्निपंख

———————————————————————-