परळी ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण संपन्न

13

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.16ऑगस्ट):- बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व डी. वाय. एस. पी राहुल धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथील परिसरात झाडे लावण्यात आले . यामध्ये लिंबु.चिंच.जाभुळ.वड.पिंपळ इत्यादी प्रकारच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस साहेब यांनी वट वृक्षाची लागवड करून या वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला.या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडून सर्वच नागरिकांना पर्यावरणाचा. समतोल राखण्यासाठी एक झाड लावून ते मोठे होईपर्यंत जपले पाहिजे. यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरवे तसेच सहाय्यक फौजदार मुंडे. बोडके. पोलिस नाईक हरीदास गित्ते . शिवाजी गोपाळघरे. विष्णू घुले. अंबड. काकडे महिला पोलिस शेवाळे मॅडम .ढोले मॅडम व इतर पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड देखील उपस्थित होते.