दि.24 ऑगस्ट रोजी स्व. जमनादास गुप्ता स्मृती दिनानिमित्त भजन संध्याचे आयोजन

14

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.24ऑगस्ट):-स्वर्गीय जमनादास गीताराम गुप्ता (गर्ग) यांच्या १० व्या स्मृतीदिनानिमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुण्यतिल औंध रोड येथील जमना अपार्टमेंट, १ ला मजला येथे होणार असून या कार्यक्रमासाठी स्वामी हिमांशू व सहकलाकार भजन सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार,दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ते ६ या वेळेत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम पुण्यत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांचे सुपुत्र व एमजे असोसिएटचे संचालक मनीराम गुप्ता यांनी दिली.