बरबडावाडी येथील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे – साईनाथ कानोले

    49

     ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-९३०७८९६९४९

    नायगाव(दि.24ऑगस्ट):-मराठा मावळा संघटनेचे नायगाव  तालुका अध्यक्ष साईनाथ कानोले यांनी बरबडावाडी येथे जाऊन  गावकर्यांच्या समश्या जाणून घेतल्या, तेंव्हा बरबडावाडी ग्रामस्थांनी सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे, साईनाथ कानोले याना बोलून दाखविले आहे.

    नायगाव तालुक्यातील बरबडावाडी या रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून  बरबडावाडी हे गाव बरबडा ह्या गावा पासून ३ कि.मी.अंतरावर  पहिले गाव गोदावरी नदी काठावर वसलेले होते. गोदावरी नदीला पूर येत असल्याने सदर गावचे पुनर्वसन होऊन अनेक वर्ष झाली आहेत, मात्र या गावाला अजूनही मजबूत रस्ता बनवण्यात आला नाही.बरबडा वाडी या गावाची लोकसंख्या अंदाजे ३०० ते ३५० इतकी असून गावातील सर्व नागरिकानीं वाडीला जाण्या येण्यासाठी रस्ता बनवण्यात यावा यासाठी खूप प्रयत्न केले परंतु कुठल्याही परिस्थितीत या रोडची समशा आजपर्यँत सुटली नसल्याने गावातील नागरिकांना रस्त्यावरून य-जा करत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

    मागील काही दिवसांपूर्वी एक महिला बिमार पडल्याने त्या महिलेला पुढील उपचारासाठी नेत असताना. रस्त्यामुळे वाहन चालवता येत नव्हते, म्हणून त्या महिलेला रस्त्यातच प्राण गमवावा लागला असल्याची माहिती गावकर्यांनी दिली. त्याकरिता संबंधित विभागाचे अधिकारी यांनी बरबडावाडी या गावाच्या रस्त्याच्या मजबुती कारणाचे काम तात्काळ सुरू करावे. अन्यथा मराठा मावळा संघटना नायगाव च्या वतीने रस्त्यावर उतरू असा इशारा साईनाथ कानोले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.