मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय” या तत्वज्ञानाला अनुसरून अँड.बाळासाहेब आंबेडकरांचे राजकारण

28

महाराष्ट्रातील आंबेडकरी बौद्ध समुदायातील बरेच बुद्धिमान लोक अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे राजनितीक रणनीतीबाबत लिहायला लागले आहेत कारण VBA निर्माण करून आज महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांना त्यांनी फार मोठा हादरा दिलेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
VBA निर्माण होऊन भारिप बहुजन महासंघ त्यात Merge झाले आहे. अँड.बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय रणनीती ही धार्मिक नाही ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ” मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय” या तत्वज्ञानाला अनुसरून आहे.जात,धर्म,पंथ या बाबींना राजकीय क्षेत्रात बाजुला ठेवणे गरजेचे आहे आणि ते आंबेडकरी बौद्ध समुदायातील राजनितीक लोकांनी समजून घेतले पाहिजे.
आज कोरोना महामारीमुळे देशात अनुसूचित जाती,जमाती,विमुक्त जाती भटकी जमात,ओबीसी,मुस्लिम आणि इतर समुदायातील गरिबांचेच जास्त हाल होत आहेत, लहान सहान धंदे बंद झालेले आहेत.आज लहान सहान वस्तु विकणारे मंदिर,मसजिद वगैरे वर अवलंबून असणारे गरिब,वंचित समाजातील लोक कोरोना महामारीमुळे आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करू शकत नाही आणि म्हणून अँड.बाळासाहेब आंबेडकर हे वेगवेगळे आंदोलने करित आहेत हा त्या मागचा सामाजिक आणि राजकीय हेतू अँड.बाळासाहेब आंबेडकरांचा आहे.
महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस अँँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आंदोलनामुळे सुरू झाल्या आणि आज गरीब लोक जिल्हाबाहेर कमी पैशात प्रवास करायला लागलेत हे जनतेच्या हिताचे कार्य बाळासाहेब आंबेडकर यांनीच केले हे महाराष्ट्रातील जनता जाणते आणि हा सामाजिक आणि राजनितीक भाग आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुध्दा आपल्या हयातीत Independent Labour Party ही आगस्ट 1936 ला निर्माण केली.नंतर, Scheduled caste Federation 1942 ला निर्माण केली, जागा पण लढविल्या आणि जिंकल्या सुध्दा.त्यानंतर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 30-9-1956 ला Republican Party of India ( RPI) निर्माण करण्याची घोषणा केली परंतु त्यांचे हयातीत RPI स्थापन होऊ शकली नाही कारण 6-12-1956 ला महापरिनिर्वाण झाले.
त्यानंतर, RPI ही 3-10-1957 ला निर्माण झाली.
सांगायचे तात्पर्य म्हणजे की, परिस्थितीनुसार राजकीय रणनीतीत बदल करायचे असतात,ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी पण केलेत आणि त्याच पावलावर पाऊल टाकून अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी VBA निर्माण केली आणि मागील निवडणूकीत प्रस्थापित पक्षांचे राजकीय नुकसान झाले हे सत्य नाकारता येत नाही.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सेनेचे दिग्गज नेते VBA मुळे पडले.
आजपर्यंतच्या काळात प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी बौद्ध समुदायातील लोकांना राजकीय डावलले,लाचार बनविले ही वस्तुस्थिती आपण आंबेडकरी बौद्ध समुदायातील लोक उघड्या डोळ्यांनी पहात आहोत.
अँड.बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय दहशत आज प्रस्थापित पक्षात आहे आणि त्यामुळे मिडियावाले सुध्दा त्यांचीच दखल घेतात कारण ते आंबेडकरी बौद्ध समुदायातील स्वाभिमानी नेते आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.
आज महाराष्ट्रातील ओबीसी, एसटी, डिटीएनटी, मुस्लिम वगैरे समुदायातील राजनितीक वंचित समुदाय बहुसंख्येने अँँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचारधारेसोबत जुळलेला आहे आणि पुढेही जुळणार आहे यात शंका नाही कारण त्यांचे राजकारण “मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय” या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञानाला अनुसरून आहे.

✒️लेखक:-अँड.शंकरराव सागोरे
प्रोफेसर काॅलनी,चंद्रपुर
मो.7875762020

▪️ संकलन
नवनाथ पौळ,केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185