काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा दौरा व मेळावा नियोजन बैठक संपन्न

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.2सप्टेंबर):-आधार बंगला चिमूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची सभाश्रीनिवासजी शेरकी (माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेमध्ये दिनांक 11 सप्टेंबर रोजी तळोधी (बा.) येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले येत आहेत. त्यावर विचारमंथन करणे व महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता सदर सभा घेण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री मा.धनराजभाऊ मुंगले काँग्रेस नेते, संजयभाऊ डोंगरे ज्येष्ठ काँग्रेस नेते, विलासभाऊ डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य, शांताराम सेलवटकर, राजूभाऊ हिंगणकर, गजाननभाऊ बुटके जिल्हा परिषद सदस्य, राजूभाऊ लोणारे, सुधीरभाऊ पोईनकर, सुधीरभाऊ पंदीलवार, संदिप कावरे, तुळशीराम बनसोड, बंडूभाऊ पराते, शंकर माहुरे, दिपक झाडे, यशवंत वाघे, लटारूजी सूर्यवंशी, जगमित्र लोखंडे, मुरलीधर निमजे, हरिश्चंद्र चौधरी, विनोद सातपुते, अमोल गजभिये, पराग जांभूळकर, गोविंदा ताजने, बादल शेख, प्रदीप तळवेकर, राजेंद्र ननावरे, निशिकांत बंडे, जाहिद शेख, सुनील दाभेकर, श्रीकृष्ण जिल्हारे, सुखदेव ढोणे, श्रावण आडे, अरुण कारमेंगे, गणेश चौधरी, राजेंद्र खाडे, मोरेश्वर बोरकर, कृष्णा निकोडे, घनश्याम शेंद्रे, सुखदेव बोरकर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते