स्वामी विवेकानंद पतसंस्थेची ४७ वी वार्षिक आँनलाईन सभा खेळीमेळीत संपन्न

26

🔸सभासदांच्या प्रश्नांचा भडीमार : १ जानेवारी पासून ९ टक्के व्याजदर

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.26सप्टेंबर):-तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची आर्थिक जिव्हाळ्याची असलेली स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्या.कडा,ता.आष्टी,जि.बीड ची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ – ३० वाजता झूम मिट अँपद्वारे आँनलाईन आयोजित कराण्यात आली होती.ही वार्षिक सभा तब्बल ४ तास,जवळपास ३०० सभासदांच्या आँनलाईन उपस्थितीत संपन्न झाली.

सुरुवातीस पतसंस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व उपस्थित संचालक मंडळाच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर पतसंस्थेचे अध्यक्ष मारुती पठाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन विषयपत्रिकेनुसार वेगवेगळे विषय मांडले त्या सर्व विषयांना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभासदांनी मान्यता दिली.विषय पत्रिकेतील काही विषयावर सभासद बाळासाहेब महाडिक,राजेंद्र लाड,शिवाजी पांढरे,स्वानंद थोरवे,सिद्धेश्वर शेंडगे,गोरक्षनाथ लाड,देविदास भवर,रविंद्र भोसले,बाळासाहेब शेंदूरकर,नितीन करडुले,दिनकर पोकळे,शिवाजी कोल्हे,सखाराम थोरवे,भाऊसाहेब गाडे,आनंद थोरवे,नानासाहेब गायकवाड,सतिष दळवी,दत्तात्रय गाडेकर,तायराम गळगटे,सुनिल वाघमारे,संदीप औटे,नारायण तरटे,अविनाश कोकाटे,रामदास बांगर आदींनी सभासदांच्या हिताच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली व उपस्थिती दर्शविली.काही प्रश्नांवर सभासद व संचालक मंडळ यांच्यात तात्त्विक दूही निर्माण झाली.पण सर्वांनी एकमेकांना समजून व उमजून घेवून काही विषयांच्या बाबतीत कानाडोळा केला.

खऱ्याअर्थाने या सभेचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे सभासद बांधवांकडून प्रश्नांचा मोठ्या प्रमाणात भडीमार होत होता.त्याच तत्परतेने अध्यक्षांनी त्याला उत्तरे दिली.याप्रसंगी काही प्रश्नांवर अध्यक्ष निरुत्तर झाले.पण सर्व सभासदांनी त्यांना समजून घेवून उत्तरासाठी सहकार्य केले.पतसंस्थेच्या काही चांगल्या निर्णया बाबत सभासदांनी अध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन करुन आभार ही व्यक्त केले.मागील सभेचे कार्यवृत्तांत पतसंस्थेचे मानद सचिव गहिनीनाथ तोतरे यांनी वाचून दाखविले.त्यास वेळ न घालता सर्वानुमते मान्यता देण्यात आली.शेवटी सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याच्या मागणीचा विचार होवून १ जानेवारी २०२२ पासून पतसंस्थेचा कर्जावरील व्याजदर ९ टक्के करण्याचा महत्तकांक्षी निर्णय एकमताने मंजूर झाला.
या पतसंस्थेच्या आँनलाईन वार्षिक सभेत काही संचालक अनुउपस्थित होते.त्यांच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी ही मागणी मोठ्या प्रमाणात सभासद बांधवांनी बराच वेळ लावून धरली.यावर अध्यक्षांनी सांगितले की,काही तांत्रिक अडचणीमुळे उदा.रेंज नसणे,आजारी असणे,महत्त्वाचा कामानिमित्त बाहेरगावी असणे अशी उत्तरे देवून हा प्रश्न निकाली काढला.याबाबत सर्व सभासद बांधवांनी समजूतदारपणा घेवून विषय सोडून दिला.

आष्टी तालुका सोडून इतर तालुक्यात बदली होवून गेलेल्या पतसंस्थेच्या सभासदांना कर्ज वितरीत करावे अशी मागणी सुज्ञ सभासदांनी केली असता त्यांना कर्ज वितरीत करता येणार नाही याचे कारण पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आष्टी तालुका आहे असे अध्यक्षांनी सांगून विषय संपवून टाकला.तसेच सध्याच्या कर्जावरील व्याजदरात जून्या व नव्या पद्धतीने (नवीन पद्धत साँफ्टवेअर) फरक पडत असल्यामुळे जास्त व्याज आकारणी होत आहे.ही बाब अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या निदर्शनास आणून दिली.याबाबत जवळपास एक तास चर्चा झाली.यावर अध्यक्षांनी फार फरक पडत नाही असे उत्तर दिले.सभासदांचे या विषयावर समाधान न झाल्यामुळे लवकरच या प्रश्नांबाबत सहविचार सभा आयोजित करुन सविस्तर मार्गदर्शन केले जाईल असे अध्यक्षांनी सांगून सहविचार सभेचा शब्द सर्व सभासदांना दिला.शेवटी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भादवे यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीतांने वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप झाला.अशाप्रकारे स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्या.कडा,ता.आष्टी ची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
———————————————-
सभासदांच्या मागणीचा झाला विचार
सभासदांची मागणी व संचालक मंडळाची अनुमती,पतसंस्थेचे आर्थिक हित या सर्व गोष्टींचा समन्वय साधून पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सध्या कर्जावरील व्याजदर १० टक्के आहे.तो १ टक्यांने कमी करुन १ जानेवारी २०२२ पासून पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदर ९ टक्के करण्यात आलेला आहे.
मारुती पठाडे
अध्यक्ष – स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्या.कडा,ता.आष्टी