वाशीम रिसोड रस्त्याची काम पूर्ववत सुरू करण्यासाठी भुमिपुत्राचा रास्ता रोको

14

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

वाशिम(दि.3सप्टेंबर):-रिसोड ते वाशिम रस्त्याचे नूतनीकरण सुरू असताना कंत्राटदाराकडून काम अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. बंद रस्त्याचे काम पुर्ववत सुरु करून तात्काळ सुरू करावे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी दिनांक 3 रोजी आसेगाव-कोयाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नोकरी व व्यापाराच्या दृष्टीने रिसोड ते वाशिम ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. नियमित ये-जा करणाऱ्यांना अनेकांना मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे तर वाहनांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करावे, खोदून पडलेल्या रस्त्याकडे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, व काम सुरू असताना पर्यायी मार्ग व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. या मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही एम देशमुख यांनी बांधकाम दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याची कबुली यावेळी दिली आहे.

आंदोलनासाठी भूमिपुत्र चे राज्य प्रवक्ते डॉ.जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवचार, युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, रिसोड तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, वाशिम तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे, मालेगाव तालुका अध्यक्ष नागेश इंगोले, ज्ञानदेव भुतेकर, गजानन पोफळे, सचिन काकडे, रवी जाधव, पवन खोंडकर, विष्णू सरकटे, संतोष खरात, महाविर सिंग ठाकुर, दत्तराव खानझोडे, शिवाजी कढणे, राजू डांगे, अमोल बाजड, अर्जुनराव तुरुकमाने, सतीश गंगावणे, शत्रुघन अवचार, बंडु जाधव, बंडू अवचार, जगदीश अवचार, गजानन अरुण, बालाजी बोरकर, राम आवचार, ज्ञानेश्वर वाघ, विठ्ठल अवचार, संतोष अवचार, रवी अवचार, विशाल मापारी, शंकर गिरे, आयची बोडे, सुनील शिंदे, गजानन वाघ, बाळासाहेब बोडखे, मदन बोडखे, अभिषेक देशमुख, राहुल डांगे, ऋषिकेश देशमुख, उमेश राईटकर, रवी गाडे, समाधान गाडे, सचिन गाडे, गणेश माने, मयूर हिवाळे, ज्ञानेश्वर कांबळे, अमोल डांगे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.