आजचे गुरूजी हाय टेक

  44

  पूर्वी पासूनच गुरूजी या शब्दांना आदर भावना आहे. पूर्ण जे गुरूजी होते, त्यांना आचार्य पण म्हणत असे. आचार्य म्हणजे गुरुकुल पद्धती मध्ये, आपल्या शिष्यांना मौखिक शिक्षण देत असत. तेव्हा लेखन कौशल्य हवे तेवढे विकसित नव्हते. लेखन केले तरी ताम्रपत्र, पर्ण, धातू, कापडावर लेखन पंखाच्या साह्याने शाहि दौलत मध्ये टाकून लिहिण्याची पद्धत होती. जस जसा काळ पालटत गेला, तसतसा शिक्षण पध्दतीत सुधारणा झाली. आणि जसजसे संशोधन होत गेले तसतसा विकास होत गेले. पूर्वी ची अध्ययन पध्दतीत आणि आताच्या अध्यापन पध्दतीत बरीच सुधारणा झाली आहे.

  आज विज्ञानाच्या युगातील शिक्षक व शिकवण्याची पद्धत पण नव नविन तंत्रज्ञान वापरून अवलंबिले आहे. या मध्ये तर अजून पुढे गेले की 21 व्या शतकातील कौशल्य वापरुन आजचा शिक्षक हा हाय टेक शिक्षक झालेला आढळून येईल. आज अध्यापन तंत्र पण हायटेक झाले आहे. या कोरोना महामारिच्या काळात तर शिक्षकांनी नव नविन तंत्रज्ञान वापरून “शाळा बंद पण शिक्षण सुरू “या सदरा खालील शिक्षण घर बसल्या विद्यार्थी साठी उपलब्ध करून दिली. आँनलाईन शिक्षण शिकविताना शिक्षक हा नव नविन शैक्षणिक ऐप वापरून, व्हिडिओ काँलींग करून विद्यार्थी साठी शिक्षण प्रक्रिया अविरत व अखंड पणे सुरू आहे. या मागील पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला तर आपणास असे जाणवेल की आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात या महामारीच्या काळात शिक्षणा मध्ये खंड पडू नये म्हणून शिक्षक धडपडतांना दिसतो. शिक्षक होण्यासाठी पण भाग्य लागतो.

  हायटेक गूरूजी व्हिडिओ बनवून युट्यूब, फेसबुक लाईव्ह, वँटस एप, झुम क्लाऊड मिटिंग पण आज काल हायटेक झाली आहे. शाळा पण आज हायटेक झालेल्या दिसतात. शाळा डिजिटल झालेल्या दिसतात. पूर्वी ची आणि आताची शिक्षणपद्धती यामध्ये खूप तफावत आढळून येते. आज शिक्षण पध्दतीत हळू हळू बदल होतांना दिसत आहे. आणि आज काळाची गरज आहे. जस जसे नव नविन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तस तसे शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थी ,पालक या आँनलाईन पध्दतीत आप आपल्या मुलांना मोबाइल देऊन शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत करत आहे. आज संगणक प्रणाली विकसित करत आपण जेवढे आकाशाला गवसणी जणू घालत आहे. यामुळे जगात कुठेही एकमेकांना क्षणात संवाद साधला जातो. जगातील ज्ञान अपडेट होत आहे, तस तसे शिक्षक व विद्यार्थी पण अपडेट होत आहे. याचाच अर्थ असा की आजचे शिक्षक व शिक्षण प्रणाली हायटेक झालेली आढळून येते
  माझा हा लेख समस्त शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त अर्पित करत आहे. आपण असेच विद्यार्थी प्रिय असून केवळ आणि केवळ विद्यार्थी साठीच सदैव धडपडत रहावे.

  मागील ईतिहासाची पाने चाळली असता आपणास राजकीय लोक, शास्त्रज्ञ, हे पण विद्यार्थी प्रिय होते, शिक्षकांनी जर मनात ईच्छा शक्ती जागृत केली तर अशक्य असे काहीच नाही. डॉ पंडित नेहरू यांना मुलेच आवडत, डॉ सर्वपल्ली राधाकृष्नन, डॉ ए पी जे अब्दूल कलाम सर यांना पण विद्यार्थी प्रिय होते, या पवित्र कार्यात शिक्षक हा देशाचा, समाजाचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर आहे.

  सर्व शक्य झाले ते म्हणजे हायटेक शिक्षण पध्दती शिक्षकांनी स्वतः अंगिकारली आहे. शिक्षण प्रवाहात स्वत वाहून घेतलेले आहे,माझे गुरूजी मा मिलिंद कुबडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ माझे गुरू मा,नितीन भालचक्र मा दिपक मेश्राम यांच्या चरणी अर्पण..शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देत आहे.

  ✒️लेखक:- गजानन गोपेवाड, राज्य समन्वयक महाराष्ट्र