दलित वस्तितील सर्व गटारी, पाइपलाइन,रस्ते दुरुस्ती करा

6

🔸अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकू

🔹केज तालुक्यातील लाडेगावातील नवयुवकांनी दिला इशारा

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.7सप्टेंबर):-आज दि ७ सप्टेंबर रोजी केज तालुक्यातील लाडेगावातील दलित वस्तितील रस्ते,नाली तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात या प्रमुख मागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय लाडेगांव येथील ग्रामपंचायत प्रशासनास उपसरपंच संजय आंबाड यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करण्याची विनंती केली.

तसे लवकरात लवकर न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला यावेळी लाडेगाव येथील नवतरुणांचं युवा नेतृत्व मा.विशाल भैय्या धिरे,सुशिल धिरे, आकाश धिरे, सुरेश धिरे,श्रावण धिरे, धर्मराज देवमाने व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.