सत्तर/तीस टक्केचा मेडिकल प्रवेशची जाचक अटी रद्द करा.-वंचित बहुजन आघाडी मागणी

14

✒️ समाधान गायकवाड(माजलगाव विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

बीड(दि.7सप्टेंबर):-राज्यात मेडिकल अभ्यासाच्या प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग निहाय आरक्षण असताना प्रादेशिक आरक्षणासाठी ७०/३० टक्के कोटा पद्धत राज्यात लागू केल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, यासाठी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखालील आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले, ७०/३० कोटा हा बेकायदेशीर व नियमबाह्य आहे, राज्यातील सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी ७०/३० टक्के कोटा पद्धत लागू आहे, राज्यात मराठवाडा विदर्भ कमी तर उर्वरित महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अधिक आहे, मराठवाड्यात केवळ पाच कॉलेज तर ६८० जागा, विदर्भात ८ कॉलेज ११९० जागा आहेत, यावर पश्चिम महाराष्ट्रात २६ कॉलेज तर ३९५० जागा आहेत या कारणा मुळे नीट परीक्षेत चांगले गुण असूनही मराठवाडा विदर्भातील विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशासाठी झगडावे लागत आहे, मराठवाड्यात गुणवत्ता मोठ्या प्रमाणात असतानाही केवळ प्रादेशिक आरक्षण लागू करताना कोणताही कायदा किंवा न करता येते लागू केली आहेव ते आरक्षण तातडीने बंद करावे, अन्यायकारक आहे.

या वर्षाच्या वैद्यकीय शाखेचे प्रवेश होण्यापूर्वी वरील असलेल्या आरक्षणास स्थगिती देऊन जात व प्रवर्गनिहाय संविधानिक आरक्षणा नुसार प्रवेश देण्यात यावेत असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे, यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे जालना औरंगाबाद निरीक्षक नितीन सोनवणे ज्येष्ठ नेते बबन वडमारे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. गणेश खेमाडे, भिमराव पायाळ, गोटू वीर,अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवठेकर, खंडू जाधव,अॅड.सदानंद वाघमारे, प्रदीप हजारे,परमेश्वर वीर लखन जोगदंड यांचेसह निवेदन देण्यात आले.