आ. लक्ष्मणराव पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केसह पक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवणार – अमोल भैय्या तिपाले

28

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.10सप्टेंबर):- तालुक्यातील युवा सरपंच तथा उदयोन्मुख नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या हिरापूरचे सरपंच अमोल भैय्या तिपाले यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्यांच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या आदेशाने व आ. लक्ष्मण पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र भैय्या मस्के यांच्या शिफारसीने ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून भाजपने उच्चशिक्षित आणि तरुणाला संधी दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर जिल्हाध्यक्ष मस्के व आ. पवारांसह पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवून आपण दिलेली जबाबदारी पार पाडू असा विश्वास अमोल तिपाले यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाने जिल्हा स्तरावर मोठे बदल केले असून तरुण पिढीला संधी दिली आहे. भाजपच्या युवा मोर्च्यांच्या जिल्हाउपाध्यक्षपदी अमोल भैय्या तिपाले यांची निवड करण्यात आली आहे. अमोल भैय्या तिपाले हे उच्च शिक्षित असून सदैव सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. त्यांच्या याच सामाजिक कामाची दखल घेऊन हिरापूरच्या जनतेने त्यांची सरपंच पदी निवड केली होती. गेल्या अडिच वर्षांपासून त्यांनी गावात विविध विकास कामे करून प्रगती केली आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क, तालुक्यातील लोकप्रियता लक्षात घेऊन तसेच उच्चशिक्षित व तरुण चेहरा म्हणून भाजपच्या युवा मोर्च्यांच्या जिल्हाउपाध्यक्ष पदासाठी जिल्हाध्यक्ष राजेन्द्र भैय्या मस्के आणि आ. लक्ष्मण आण्णा पवार यांनी शिफारस केली होती. या शिफारशीमुळे व माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात आला असून उच्च शिक्षित, तरुण तडफदार आशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

कार्यातून पदाची गरिमा वाढवणार-तिपाले आपल्याला मिळालेल्या जबाबदारी चे भान ठेवून जिल्हाध्यक्ष व आ. पवार यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वसामान्य जनतेच्या कामी येन्याचा प्रयत्न करू, तसेच सामाजिक कामाच्या माध्यमातून या पदाची गरिमा टिकवून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास जिल्हाउपाध्यक्ष अमोल भैय्या तिपाले यांनी व्यक्त केला.