निसर्गाचे रूप

44

निसर्गाचे रूप हे कधी व कसे बदलेल हे सांगणे कठीणंच आहे , कधी होत्याचे नव्हते करतो तर कधी नसल्याले ही प्रदर्शित करतो , खरं तर ही सर्व किमया निसर्गाचीच आहे जिचा अंदाज कोणी ही लाऊ शकत नाही .निसर्ग नेहमी त्याचे रूप बदलत असतांना आपनास पहावययास मिळाले असेल तो कधीच एक सारखा नसतो ऋतु प्रमाने तो बदलतो .

निसर्गाचे बदलते रूप काही वेळी चांगले ठरते , तर काही वेळी त्याचे दुष्परिणाम ही माणसाला सोसावे लागतात. त्याचा सर्वात मोठा फटका शेतकरी , व मजूर वर्गाला बसतो निसर्ग बदलणं म्हनंजेच थोडक्यात त्याला नैसर्गीक वातावरण बदल म्हनता येइल .त्यात बदल झाला की कधी दुष्काळ पडतो , कधी अतिवृष्टी होते , कधी पावसाचे रूप मध्यम असते त्यामुळे पूरक असा पाऊस पडतो , नैसर्गीक संकट जसे की दुष्काळ किंवा अतिवृष्टी या दोन्हीमध्ये नैसर्गीक संकट सहसा आहे असं गृहित धरले जाते .पण काही वेळेस पर्जन्यमान सुळीत असून सुध्दा फार मोठे भयंकर संकटे येतात जसे की वादळ वारा , पर्जन्यमान बरोबर पण पाऊस वेळेत नसून अवेळी येणं वातावरणात खूप मोठा बदल होऊन रोगराई पसरण, हे ही निसर्गाचे एक बदलते स्वरूपच म्हणावं लागेल .

निसर्गाने जेंव्हा जेंव्हा त्याचे स्वरूप बदलले तेंव्हा तेंव्हा त्याचा फायदा व तोटा ही शेतकऱ्यांनाचा होतांना पहावयास मिळतो .कारन महत्वाचे म्हणजे त्यांच जगणंच हे निसर्गावर अवलंबून आहे पाऊस पाणी ऊन वारा सुरळी राहिला की शेतातल सर्व पिकं जोमात येतं पण पिकं हाती लागेपर्यंत निसर्ग सुरळीत राहिला तरच , काही काही वेळा त्यांच पिकं जोमात असतं पण मध्येच निसर्गाचाच एक भाग म्हणजेच पाऊस हा ओढ धरतो अगदी पाना पाल्याचा पाचोळा झाला तरी तो येण्यासाठी तयार नसतो , अनेकदा नैसर्गीक वातावरणात बदल होऊन अनेक प्रकारच्या रोगांची उत्पत्ती होतांना दिसते , त्याचा ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांलाच तोटा होतो , अगदी डौलदार आलेले पिकं रोगाच्या तावडीत जाते , रोगाणी पिकं लखडुन जाते त्याचाच परीणाम पिकांच्या फुलाफळांवर होऊन त्यातून मिळणारे उत्पन्न कमी होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवस्थेर भयंकर प्रमाणात होतो.

अनेक वर्षा पासुन मेहनतीने व कष्टाने शेती करत आलेला शेतकरी निसर्गाच्या याच कारणा मुळे कधी सुखी नाहीये , निसर्ग नेहमी बदलत राहतो त्याचे तो वेगवेगळे रूप दाखवत राहतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतु असून कधी उन्हाळ्यात पावसाळा करतो तर कधी पावसाळ्यात उन्हाळा करतो , निसर्गाचं हे नेहमी चालत राहतं .निसर्ग प्रत्येक वेळी क्रूररच वागतो असं देखील नाही काही वेळी नैसर्गीक वातावरणात खूप मोठे बदल होतात वेळोवेळी पर्जन्यमान सुध्द वातावरण राहुन वर्षभर नसणारी रोगराई इत्यादी मुळे सुखं आणी समृध्दीन भरलेलं वातावरण निसर्गामुळेच येते.

✒️लेखक:-अंगद दराडे,माजलगाव बीड
मो:-8668682620