
✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नेरी(दि.12सप्टेंबर):-कोरोणा महामारीने जगात हाहाःकार माजला असतांना नेरी त काल एकाच दिवशी सात कोरोणा पाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने गावकऱ्यांनी नेरीत जनता संचारबंदी लावण्याची मागणी केली आहे.
कोरोणा महामारी ला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे,सोशल डिस्टनसिंग पाळणे,अतिमहत्त्वाचे काम असेल तरच बाहेर जायचे हे महत्त्वाचे मुद्दे पालन केले तरच कोरोणा रुग्णांची वाढती साखळी तोडता येणार, नाही तर कोरोणा कसा रोखता येणार? असा प्रश्न तज्ञ मंडळींना पडला आहे तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने किमान जनता संचारबंदी लागु करुन कोरोणा साखळी तोडता येऊ शकते अशी गावकऱ्यांची मागणी आहे.