कोरपना नगर पंचायतीच्या दुर्लक्षते मुळे पिण्याचा पाण्याची देखभाल व दुरुस्तीची ऐैसी तैशी

31

✒️शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9624896574

जिवती(दि.12सप्टेंबर):-नगर पंचायत कोरपना येथे नळ योजना नाही राज्यातील हि नळ योजना नसलेली एकमेव महिलानगर पंचायत असावी ग्रामीण भागात कोरपना च्या चहौबाजुनी असलेली खेडी नळयोजनेचा शुद्ध पाण्याचा वापर करीत आहे गावात एकही सार्वजनिक विहीर नाही होत्या त्या विहीर तत्कालीन ग्राम पंचायतीने बुजविल्या जुने पंरम परागत.

विहीर बुज वुन इतिहास पुसण्याचा हेतु पदाधिकारीना माहीत असावा मात्र गावात अनेक कुपन लिका प्लाटफार्म नासघुस झाले सांचणारे पाणी बोअर मध्ये जाऊन दुषीत पाणी वापराची पाळी नागरीका वर आली अनेक बोरवेल दुरुस्ती अभावी वार्ड वासीयाना तार बांधुन पाणी उपसा करावा लागतो विकासाच्या थापा मारणारे पदाधिकारी नट बोल्ट लावण्याकडे दुर्लक्ष करतात ग्रामीण पाणी पुरवठा समीती हि कागदावरच असल्याचे विदारक चित्र दिसुन येते सभापती यांना समीती चे अधिकार काय हे नकळल्यामुळे नगर पंचायतीच्या देखरेख दुरुस्ती व स्वच्छता कामावर प्रश्नचिन्ह उपस्थीत होत आहे.

कोरोना मलेरिया डेंगु आजार पसरत असताना नागरिका मध्ये भितीचे वातावरण असताना मात्र नगर प्रशासन गाढझोपेत असत्याने देखरेख दुरुस्ती कामाची ऐैसी तैसी होत असल्याची तक्रार नगर सेवक सुहेल आबिद अली यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली असुन दुषीत पाण्यामुळे नागरीकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शंका निर्माण होईल असे नमुद केले आहे नुकत्याच गडचांदुर शहरात डेंगु मुळे रूगण दगा वल्यामुळे स्वच्छता सांडपाणी व्यवस्था सुरळीत व्हावी अशी मागणी केली आहे.